Nitesh Rane : दंगली घडवणारा मास्टरमाईंड मातोश्रीवर, नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात
Nitesh Rane on Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं ठाकरे गटाला सहन होत नाहीय. कारण 2004 प्रमाणे उद्धव ठाकरेंना आता देखील राज्यात रझा अॅकॅ़डमीला हाताशी धरून दंगल घडवायचीय मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे ती यशस्वी होत नाही. म्हणू फडणवीसांवर ठाकरे गट टीका करत आहे.
मुस्लीम लीगचे प्रवक्ते असलेले संजय राऊतांनी नाशिक त्र्यंबकेश्वराच्या मंदीरात गेलेले मुस्लिम हे धुप करण्यासाठी तेथे गेले असं सांगितले. मात्र मंदीर स्ट्रस्टने या लोकांनी मंदीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला हट्ट केला. हे राऊतांच्या लक्षात आलं नाही का? त्यांना मुस्लिमांवर प्रेम आहे. पण देवेंद्र फडणवीसांचे आभार त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. तसेच आज मंदीरात शुद्धीकरणाचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान भाजपवर दंगली घडवण्याचा आरोप केला जात आहे. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट त्यांनी 2004 ला घ़डवून आणलेल्या दंगलीवर बोलायाला तयार नाही. मात्र यातील अरूण बेडकेकर हे माजी सरचीटणीस या प्रकरणावर बोलायला तयार आहेत.
….तोपर्यंत छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख ‘औरंगाबादच’ करावा, मुंबई हायकोर्टाचे आदेश
त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचा जो दंगली घडवणारा मास्टरमाईंड मातोश्रीवर बसलाय त्यांना विचारा की, दंगली घडवण्यात उद्धव ठाकरेंचा काय हात आहे. तसेच ते संविधानिक संस्था आणि पदांवर संजय राऊतांकडून आरोप केले जात आहेत. अशी टीका संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर केली.
‘भीती निर्माण होईल असं वातावरण तयार करू नका’; सुप्रीम कोर्टाने ‘ईडी’ला सुनावले</a>
दरम्यान राऊतांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे यांच्या काळात कुठलीही दंगल घडली नाही. तर कर्नाटकमध्येच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दंगल झाली. राज्य अस्थिर आणि तणाव निर्माण करुन मत मागायची भाजपला सवय असून कर्नाटक आणि मणिपूरमध्ये तुमचं राज्य आहे. तेथे निवडणुकीपूर्वी धार्मिक तेढ निर्माण केली जाते. असा आरोप राऊतांनी भाजपवर केला होता.