Download App

पराग सोमन वर्धा झेडपी CEO, सौम्या शर्मा अमरावतीच्या आयुक्त; IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले

मागील आठवड्यात चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आज पुन्हा राज्य सरकारने आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Maharashtra IAS Transfer : मागील आठवड्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IAS Transfer) झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा राज्य सरकारने आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सीईओ पराग सोमन यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे आता पुण्यातील यशदाचे उपसंचालक म्हणून पदभार घेतील.

राज्य सरकारने आज चार आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सौम्या शर्मा आधी नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. आता त्यांच्याकडे अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ जिथिन रहमान यांना बीड जिल्हा परिषदेची जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या जागी पराग सोमन वर्धा झेडपी सीईओ म्हणून काम पाहतील.

बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली

पराग सोमण : मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हा परिषद

सचिन कळंत्रे : उपमहासंचालक यशदा, पुणे

सौम्या शर्मा-चांडक : आयुक्त, अमरावती महानगरपालिका

जिथिन रहमान : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड

मागील आठवड्यात कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

नितीन पाटील : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ

ए. बी. धुळाज : सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई

लहू माळी : आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई

बाबासाहेब बेलदार : व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुल मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई

आदित्य जीवने : सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजीनगर

मिन्नू पी.एम. : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया

मानसी : आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर

आता फक्त चार दिवसांची कसोटी, ICC मोठ्या बदलांच्या तयारीत; जाणून घ्या, मेगा प्लॅन!

follow us