बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

  • Written By: Published:
बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

Pooja Khedkar Protected Arrest Till March 17 : बडतर्फ माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) हिला सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला खेडकरने आव्हान दिलं होतं. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना वेळ वाढवून दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने खेडकरला चौकशीत सहकार्य करण्यास सांगितलं आहे.

भारतात एकाच पक्षाचं वर्चस्व असू शकत नाही; कारण प्रादेशिक अस्मिता आणि;चंद्रचूड काय म्हणाले?

बडतर्फ भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. खेडकर हिच्यावर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

खेडकरने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत युक्तिवाद केला आहे की, माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मी दिव्यांग असलेली अविवाहित महिला आहे. तसंच, मला शारीरिक पडताळणीनंतर नियुक्त करण्यात आले होते. यामुळे अखिल भारतीय सेवा कायदा आणि नियमांनुसार मला संरक्षण मिळते, असे खेडकरने म्हटले आहे. दिव्यांग नसल्याचे सिद्ध होईपर्यंत हक्क कायद्याअंतर्गत पुढील संरक्षण मिळण्याचाही अधिकार आहे, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube