भारतात एकाच पक्षाचं वर्चस्व असू शकत नाही; कारण प्रादेशिक अस्मिता आणि…चंद्रचूड काय म्हणाले?

  • Written By: Published:
भारतात एकाच पक्षाचं वर्चस्व असू शकत नाही; कारण प्रादेशिक अस्मिता आणि…चंद्रचूड काय म्हणाले?

Former Chief Justice Dhananjay Chandrachud : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. ते न्यायमुर्ती असताना कायम चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा चर्चेत आलेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या नेतृत्वाखाली भारत एकाच पक्षाचे वर्चस्व राहील, ही शक्यता माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी फेटाळली आहे. (Chandrachud ) भारतात एकाच पक्षाचे राज्य असेल, ही शक्यता २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाने फोल ठरविली आहे, असंही ते म्हणाले आहेत. ते बीबीसी या माध्यमसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला; पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

भारताची वाटचाल एक पक्षीय देशाकडे चालली आहे. तसेच सत्तेवरील भाजपने स्वहिताच्या रक्षणासाठी न्यायालयांवर दबाव टाकला होता, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या अग्रलेखात म्हटले असल्याकडे सॅकर यांनी लक्ष वेधले. चंद्रचूड यांनी हा मुद्दा निखालस खोटा अल्याचे सांगत २०२४ मधील लोकसभा निवडणूक निकालाचा उल्लेख केला. ते म्हणाले, तुम्ही भारतातील राज्यांकडे पाहिले तर राज्यांची प्रादेशिक अस्मिता आणि स्वतंत्र ओळख दिसेल. निवडणुकीत आमच्या अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक राजकीय पक्षांची कामगिरी अत्यंत आश्‍वासक आणि उत्तम होती. तेथे ते पक्ष सत्तेवर आहेत.

भारतातील न्यायव्यवस्थेत वंशवाद केला जातो आणि येथे उच्च वर्ग, पुरुष, हिंदूंच्या उच्च जातींचे वर्चस्‍व आहे का, या प्रश्‍नावर चंद्रचूड यांनी असहमत असल्याचे सांगत ‘भारतीय न्यायव्यवस्थेचा पाया असलेल्या कनिष्ठ स्तर, जिल्हा न्यायालयांकडे पाहिले तर राज्यांमधील न्यायालयांच्या नव्या भरतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला असल्याचे दिसेल.

राहुल गांधींचा मुद्दा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यातील शिक्षेबद्दल विचारल्यावर चंद्रचूड म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने नंतर तो निकाल स्थगित केला. शिक्षेचा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. परंतु त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तुम्ही ज्या राजकीय नेत्याबद्दल बोलत आहात, ते संसदेत पुन्हा कामकाज करू शकतात, असा याचा अर्थ होतो.

राजकीय नेत्यांसह ज्यांना जामीन देण्यात आला, त्यांचा हवाला देत चंद्रचूड म्हणाले, उच्च न्यायालये आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालय वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे, हे दाखवून दिले आहे. वैयक्तिक प्रकरणांत खासगी मतांतरे असू शकतात. पण व्यक्तीगत स्वातंत्र्य जोपासण्यात न्यायालय सर्वांत पुढे आहे, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच लोकांचा आमच्यावर विश्‍वास आहे.

आपला समाज प्रगल्भ

गणेश चतुर्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरी भेट दिली होती. या भेटीवर विरोधी नेत्यांकडून टीका झाली. घटनात्मकदृष्ट्या उच्च पदाधिकाऱ्यांमधील भेटीत ज्या शिष्टाचाराचे पालन केले जाते, तेथे अन्य कोणत्याही मुद्द्यांना स्थान नसते, हे समजण्याएवढी आपली समाज व्यवस्था प्रगल्भ आहे, असे चंद्रचूड म्हणाले. लोकशाही समाज व्यवस्थेत न्यायालयाची भूमिका संसदेतील विरोधकांसारखी नसते. आम्ही येथे खटल्‍यांचा निकाल आणि कायद्याने काम करतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube