Download App

Irshalwadi : शाळकरी मुले ओरडली अन् जागे झाले सगळे गाव; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं?

Khalapur Irshalwadi Landslide : मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड या गावावर दरड कोसळली. अख्ख गावच या महाकाय दरडीखाली दबलं गेलं. अनेक जण दबले गेले तर काही जणांनी जीवही गमावला. या घटनेनंतर गावात मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. सगळीकडे आक्रोश अन् आर्त किंकाळ्या कानी पडत आहेत.

बुधवारी रात्री इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळली. इर्शाळवाडीच्या पायथ्यापासून काही उंचीवर ठाकूरवाडी आहे. मात्र, पायथ्यापासून ठाकूरवाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे कुदळ, फावडे आणि हातांनीच ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे.

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

या रात्री नेमकं काय घडलं, याची माहिती प्रत्यक्षदर्शीने एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. या वक्तीने दिलेल्या माहितीनुसार, काही शाळकरी मुलांमुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. त्यानंतर गावकरी घरातून बाहेर पडले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी शाळेतील काही मुलं मोबाइलवर व्हिडीओ पाहत होती. त्याच वेळी त्यांना वरुन येणाऱ्या दगडांचा आवाज आला. त्यांनी आरडोओरडा करून गावातल्या लोकांना जागं केलं.

मृतांच्या नातेवाईकांनी 5 लाखांची मदत

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावात मुसळधार पावसाने रौद्ररुप दाखवलं. या पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाला. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. लोकांचे रडणं, ओरडणं आणि आपल्या आप्तस्वकियांना शोधण्यासाठी सुरू असलेली धडपडच दिसते आहे. या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. आता या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत माहिती घेतली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.

Tags

follow us