Download App

ठाकरेंची यादी जाहीर होताच काँग्रेसचा भडका; “उद्धवजी हे योग्य नाही, फेरविचार करा”, थोरातांचा संताप

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असलेल्या सांगली, मुंबईच्या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाकरे गटाच्या या तिरक्या चालीने आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेत्यांचा संताप झाला असून त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचा हा निर्णय योग्य नाही, त्यांनी फेरविचार करावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली आहे.

Balasaheb Thorat : दहशतीसाठी येता, खोट्या केसेस टाकता पण, आम्ही.. थोरातांनी विखेंना ललकारलं

थोरात म्हणाले, की महाविकास आघाडी म्हणून जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे. तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती तेथील उमेदवारही जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेत आहोत. काँग्रेसची त्या जागांबाबत आग्रही मागणी आहे. अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शिर्डी मधून कोण उमेदवार असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अखेर शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची मशाल वाकचौरे यांच्या हाती सोपविण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या 17 उमेदवारांच्या यादीत वाकचैरे, वाघेरे यांच्यासह विद्यमान पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. यात माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरविण्यात आले आहेत. तर अन्य सात मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

follow us