Bacchu Kadu : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीत (Lok Sabha Election) धुसफूस वाढू लागली आहे. जागावाटप अजून नक्की नाही. अंतिम निर्णयासाठी दिल्लीत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यातही सारे आलबेल नाही. महायुतीतील घटक पक्षांत नाराजी वाढू लागली आहे. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आम्ही महायुतीत आहोत की नाही याबाबत संभ्रम आहे. पण नाक कसे दाबायचे आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे, अशा सूचक शब्दांत कडू यांनी दिला आहे.
Bachhu Kadu : पवारांना निमंत्रण अन् बच्चू कडूंचा मविआमध्ये जाण्यास ग्रीन सिग्नल? पाहा फोटो
आम्ही महायुतीत आहोत की नाही याबाबतच संभ्रम आहे. चर्चा झाली तर ठीक नाहीतर आम्ही सुद्धा मैदानात उतरण्यास तयार आहोत. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात किमान 200 उमेदवार देण्याची आमची तयारी आहे. आमची भूमिका नेहमीच ठाम असते. ज्यावेळी आमची गरज असते तेव्हा चार-चार फोन केले जातात. मागील वीस वर्षांपासून मी या गोष्टी अनुभवत आहे. त्यामुळे नाक कसे दाबायचे आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे.
जागावाटपाबाबत महायुतीकडून अद्याप काहीच विचारणा झालेली नाही. मात्र आम्ही स्वतःहून चर्चा करणार नाही. त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही लहान पक्ष नाही. आम्ही आजवर कोणत्याही नेत्यासमोर झुकलेलो नाही. त्यांनी जर चर्चा केली तरच आम्ही करू. आमचा पक्ष लहान वाटत असला तर सर्वात मोठी यादी आमच्याकडेच आहे. इतर पक्ष चारशे ते पाचशे उमेदवार देतील तर आम्ही दोन ते तीन हजार उमेदवार देऊ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी भाजपाला दिला.
वसंत मोरेंचं नाव घेत राऊतांकडून भाजपला नवं नाव; म्हणाले, ‘वॉशिंग मशिनच्या..
महायुतीकडून जागांबाबत विचारणा झालीच नाही तर प्रहार राज्यात मा खासदार मोहिम राबवेल. महायुतीचा धर्म पाळण्याचं काम त्यांचं आहे. तोडणे आमचं काम आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे अन्य पक्षांना विचारात घेण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. परंतु, भाजपकडून दुसऱ्या पक्षांना कशी वागणूक मिळते याचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, असा टोला कडू यांनी भाजपला लगावला.