मनोज जरांगेंसाठी बच्चू कडू मैदानात! भुजबळांनाच भिडले…
Bachhu Kadu : कुणबी नोंदी बोगस असल्याचं वाटतं तर तिथं जावं, या शब्दांत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे-भुजबळ वादात बच्चू कडू मैदानात उतरुन थेट छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) भिडल्याचं पाहायला मिळालं आहे.
घटनादुरुस्ती नाकारली पण ‘त्या’ ठरावाला नार्वेकरांचीच हजेरी; ठाकरे गटाने पुराव्यात व्हिडिओच दाखवला
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून शिंदे समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. शिंदे समितीला राज्यभरात जवळपास 29 हजार नोंदी आढळून आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी बोगस नोंदी मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन जरांगे-भुजबळ यांच्यात वादंग सुरु आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्यात आढळलेल्या कुणबी नोंदीची माहिती देताना त्यांनी छगन भुजबळ काय बोलत आहेत, त्यावर आपण बोलणार नाही. एकीकडे जुन्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे, दुसरीकडे या सर्व नोंदी बोगस असल्याचे भुजबळ सांगत आहेत. या नोंदी बोगस असल्याचे वाटत असेल तर त्यांनी येथे यावे, नोंदी तपासाव्यात, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
‘सरकारकडून माझ्यावर ट्रॅप लावला जातोय’; मुंबईतील आंदोलनाआधी जरांगेंचा गंभीर आरोप
तसेच या नोंदी बोगस असतील तर अधिकाऱ्यांना अन् मलाही फाशी द्या, अशा शब्दात बच्चू कडू यांनी भुजबळांना चॅलेंज दिले आहे. एकट्या मराठवाड्यात 31 हजार कुणबी नोंदी आढळू आल्या असून अनेक भागांतही या नोंदी आढळून येत असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शिंदे समितीला ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांना राज्य सरकारकडून कुणबीचे दाखले देण्यात येत आहेत. मात्र या नोंदीची शहानिशा करुनच प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. तर ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना याच नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित करुन सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून लावून धरण्यात आली आहे. तर सरसकट मराठा आरक्षणाला छगन भुजबळांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.