Maharashtra BJP Candidate List Out For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. तर, पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), बीडमधून पंकजा मुंडे आणि नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना तर, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
The BJP Central Election Committee has decided on the following names for the upcoming Lok Sabha elections.
(1/2) pic.twitter.com/5ByPC2xoW1
— BJP (@BJP4India) March 13, 2024
कुणाला मिळालं तिकीट?
भाजपची यादी जाहीर, महाराष्ट्रातून लोकसभेसाठी हे 20 उमेदवारी रिंगणात
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव – स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर – नितीन गडकरी
१९) अकोला – अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
BJP Candidate List : सुजय विखे हे राम शिंदे यांना ठरले भारी
दिग्गजांना मोदी-शाहंच्या धक्कातंत्राचा फटका
गेल्या काही दिवसांपासून भाजपनं विविध राज्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज (दि.13) भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीतही अनेक दिग्गजांना मोदी-शाहंच्या धक्कातंत्राला सामोरे जावे लागले आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडमधून प्रीतम मुंडे, उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आले आहे. तर, जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचेही तिकिट कापण्यात आले आहे.