Download App

रणजितसिंह निंबाळकरांचा एककलमी कार्यक्रम; माढ्याचा उमेदवार बदला, कार्यकर्त्यांच्या हट्टानं अजितदादा पेचात

Madha Lok Sabha Election : ‘माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी (Madha Lok Sabha Election) जाहीर झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्याची त्यांचा प्रचार करण्याची इच्छाच नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपाचा आणि उमेदवाराचा सगळा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमाने काम करू’, या संतप्त भावना आहेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या. महायुतीने रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिलं असलं तरी ते कार्यकर्त्यांना मान्य नाहीत. या घडामोडींवरून निवडणुकीआधीच महायुतीत वादाचं रण पेटलं आहे.

Lok Sabha 2024 : जैन अन् मुस्लिमांना उमेदवारी; वंचित बहुजन आघाडीचा इलेक्शन अजेंडा सेट !

माढा, सातारा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी आज एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी  रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमाने काम करू आणि त्या उमेदवाराला खासदार बनवू  असे कार्यकर्त्यांनी या बैठकीत सांगितले.

साताऱ्यात सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना सातारा लोकसभा तिकीट द्यावे अशी मागणी बैठकीला उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार रामराजे निंबाळकर,आमदार दीपक चव्हाण,आमदार मकरंद पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवारांची पॉवर! भाजपला धक्का, मोहिते पाटील हाती घेणार ‘तुतारी’; ‘माढ्या’चा शिलेदारही फिक्स?

मोहिते पाटील हाती घेणार तुतारी 

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघ यंदा खास चर्चेत (Madha Lok Sabha Election) आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. निंबाळकरांना महाविकास आघाडीचा कोणता शिलेदार टक्कर देणार याचा अजून खुलासा झालेला नाही. मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पवार गटासाठी गुडन्यूज मिळाली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उद्या शरद पवारांबरोबर मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे उद्याच धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्याचे शरद पवार गटात घाटत आहे.

follow us