Lok Sabha 2024 : जैन अन् मुस्लिमांना उमेदवारी; वंचित बहुजन आघाडीचा इलेक्शन अजेंडा सेट !

Lok Sabha 2024 : जैन अन् मुस्लिमांना उमेदवारी; वंचित बहुजन आघाडीचा इलेक्शन अजेंडा सेट !

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) जैन, मुस्लीम आणि गरीब समाजातील घटकांना उमेदवारी देण्यात येणार आहे. ज्यात उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतरांची ही नवी वाटचाल राहणार आहे. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे राजकारणात आणि निवडणुकीत पैसा वापरला जातो. निवडून गेलेल्यांची बांधिलकी मतदारांशी बांधिलकी राहत नाही. त्यामुळे ठरवून दिलेल्या खर्च मर्यादेत निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची घोषणा केली. तसेच बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे (Manoj Jarange) दुर्लक्ष केले. काल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत दुसऱ्या टप्प्याची चर्चा 31 मार्च, 1 व 2 एप्रिलला पूर्ण करण्याचा निर्णय झाला.

मोठी बातमी : आंबेडकरांनी मोठा डाव टाकला; जरांगेसोबत नवी आघाडी करत स्वतः अकोल्यातून लढणार

चर्चेदरम्यान शेतकरी व बेरोजगारांचा प्रश्न आणि शेती उद्योग याला प्राधान्य कसे द्यायचे आणि उद्योग व्यवसायांसदर्भात चर्चा झाली. या चर्चेत आजपर्यंत ओबीसी समाजाचे फारसे प्रतिनिधीत्व नव्हते. त्यामुळे आता ओबीसी, भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि जिंकून आणायचं असा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगे पाटलांचे समर्थन राहणार आहे.

जैन आणि मुस्लीम समाजाला उमेदवारी देणार 

दुसरं म्हणजे मुस्लिम समाजातील लोकांना उमेदवार देण्याचा निर्णय झाला. तिसरा जैन समाजालाही उमेदवार द्यायचं या बैठकीत ठरलं. राज्यात उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतरांची ही नवी वाटचाल राहणार आहे. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे राजकारणात आणि निवडणुकीत पैसा वापरला जातो. त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी मतदारांबरोबर राहत नाही. त्यामुळे खर्च मर्यादेच्या आत निवडणुका पार पडतील यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले !

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube