मोठी बातमी : आंबेडकरांनी मोठा डाव टाकला; ‘मविआ’ शी काडीमोड, लोकसभा स्वतंत्र लढवण्याची घोषणा

  • Written By: Published:
मोठी बातमी : आंबेडकरांनी मोठा डाव टाकला; ‘मविआ’ शी काडीमोड, लोकसभा स्वतंत्र लढवण्याची घोषणा

Prakash Ambedkar Annaoused Loksabha Candidate Name : प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करत लोकसभा निवडणुकांसाठी वंचितच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावेळी आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत युती करणार असल्याचीही घोषणा केली आहे. मात्र, याबाबत जरांगेंनी 30 मार्चपर्यंत थांबण्याची विनंती करण्यात आल्याचे आंबेडकरांनी सांगितले. या नव्या आघाडीमुळे आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेडकर स्वतः अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

Lok Sabha 2024 : जैन अन् मुस्लिमांना उमेदवारी; वंचित बहुजन आघाडीचा इलेक्शन अजेंडा सेट !

वंचितची पहिल्या यादीत कुणाला मिळीली संधी

प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. तर, भंडारा-गोंदिया : संजय केवट, गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी, चंद्रपूर : राजेश बेले, बुलडाणा : वसंतराव मगर, अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान, वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके तर, यवतमाळ-वाशिममधून खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube