Download App

Market Committee Election : आधी मिळाले एक लाख, मतदानाचा फोटो दाखवा आणखी एक लाख घ्या !

Market Committee Election : राज्यात ठिकठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (Market Committee Election) आज मतदान होत आहे. मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. गावकीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बाजार समितीच्या चाव्या आपल्याच ताब्यात रहाव्यात यासाठी नेते मंडळींनी जोर लावला आहे. मग मतदारांना पैशांचे वाटप असो, त्यांना सहलीला नेणे असो किंवा मतदानासाठी थेट बसने मतदान केंद्रांवर घेऊन येणे असो असे एक से बढकर एक हातखंडे आजमावत आहेत.

पुणे जिल्ह्यातील हवेली बाजार समितीतील पैशांच्या करामतीची तर बातच न्यारी आहे. येथे मतदारांना आधी एक लाख रुपये तर दिले होतेच. मात्र, मतदान केल्यानंतरचा फोटो मतदारांनी दाखविल्यानंतर आणखी एक लाख रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत होता.

बाजार समिती निवडणुकीत विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत असे दोन मतदारसंघातील मतदानाच्या रेटची चांगलीच चर्चा होती. येथील मतदार आधीच गर्भश्रीमंत. त्यात निवडणुकीच्या आधीच एक लाख रुपये मिळालेले. मतदान केल्यानंतर मतदानाचा फोटो दाखवल्यानंतर आणखी एक लाख रुपये मिळत होते. सोसायटी मतदारसंघातील एका मतदानासाठी पन्नास हजार रुपयांचा रेट होता.

पालकमंत्री विखेंच्या मध्यस्थीनंतर शिर्डी बंदचा निर्णय मागे, विखेंनी काय दिले आश्वासन ?

राज्यात आज 147 बाजार समित्यांसाठी मतदान पार पडले. राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजार समित्या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 88 बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यात बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. आज काही बाजार समित्यांसाठी मतदान पार पडले. बाजार समितीची सत्ता मिळवण्यासाठी उमेदवारांनी जोरदार तयारी केली होतीच. त्यात त्यांना नेते मंडळींचीही साथ मिळाली.

मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांना पैसे देण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. यासाठी मतदारांनी मतदान केल्याचा फोटो दाखविल्यानंतर त्यांना पैसे दिले जात होते. सोसायटी मतदारसंघासाठीच तब्बल पन्नास हजार रुपयांचा रेट चालू होता अशी चर्चा आहे.

बोगस मतदानाच्या तक्रारी

हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदान केंद्रावर गोंधळ पाहण्यास मिळाला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. येथे बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर काही काळ मतदान थांबवण्यात आले होते. अनेक उमेदवारांचं मतदान हे मतदान केंद्रावर येण्याआधीच झाल्याचे उघड झाल्याने गोंधळ उडाला.

Cm Eknath Shinde : पोलिसांकडून लाठीचार्ज झाला नाही, राजकारणासाठी राजकारण करु नका…

मतदार बसमधून थेट मतदान केंद्रांवर

नगर जिल्ह्यातील सात मतदारंसघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आले. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीही मतदान झाले. मतदानासाठी नगर शहरात काही मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. येथे गुलमोहोर रोडवरील एका शाळेत मतदान केंद्र होते. या केंद्रावर सकाळी एक चकीत करणारा प्रकार घडला. सत्ताधारी भाजपने मतदारांनी थेट बसमधून मतदान केंद्रावर आणले. विरोधकांना हा प्रकार आजिबात रुचला नाही. येथे काही काळ वादही झाला. विरोधी महाविकास आघाडीने भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पाथर्डीत शाब्दिक चकमक

पाथार्डी बाजार समितीच्या मतदानातही वादंग पाहण्यास मिळाले. येथील मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांच्या समर्थकांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Tags

follow us