Sonia Duhan Joins Congress : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आलेल्या असतानाच शरद पवार गटाला (Sharad Pawar) धक्का देणारी बातमी आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लेडी जेम्स बाँड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी (Sonia Duhan) अखेर शरद पवारांची साथ सोडली आहे. सोनिया दुहान पक्ष सोडतील आणि अजित पवार गटात सहभागी होतील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. सोनिया दुहान यांनी पक्ष सोडला मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याऐवजी काँग्रेसला (Congress Party) पसंती दिली.
सोनिया दुहान मागील अनेक दिवसांपासून हरियाणाच्या राजकारणात (Haryana Politics) सक्रिय झाल्या आहेत. हरियाणात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊनच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. कदाचित त्या विधानसभा निवडणूक लढतील असेही (Haryana Elections) सांगितले जात आहे. सोनिया दुहान या हरियाणाच्याच आहेत. दुहान यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला.
NCP Political Crisis : पवारांची ‘लेडी जेम्स बाँड’ अजितदादांसह 9 आमदारांना स्वगृही आणणार?
सोनिया दुहान शरद पवार यांना आपले राजकीय गुरू मानतात. सोनिया पुण्यात विमान पायलटचे प्रशिक्षण घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत त्यांनी एनसीपी स्टुडेंट विंगचे नेतृत्व केले होते. महाराष्ट्रात ज्यावेळी राजकीय संकट निर्माण झालं. राष्ट्रवादीत फूट पडली. त्यावेळी सोनिया दुहान चर्चेत आल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या विद्यार्थी शाखेच्या कार्यालयातून प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांचा फोटो फेकून दिला होता. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमधून बाहेर काढण्याच्या मोहिमेत सोनिया दुहान यांचा मोठा वाटा राहिला होता.
सोनिया दुहान काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत (New Delhi) काँग्रेस पक्षात सहभागी झाल्या. सोनिया दुहान सोशल मिडियावर स्वतःला हरियाणा की बेटी म्हणून प्रोजेक्ट करत होत्या. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या निवडणूक लढतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. नारनौंद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. या मतदारसंघात सध्या जनता जननायक पक्षाचे राम गौतम कुमार आमदार आहेत.
Sharad Pawar : पक्षातील बंडाळीवर राजीनामा नाट्य, पवारांच्या राजीनामा मागे घेण्यावर शिरसाटांचा टोला
2014 मध्ये या मतदारसंघात कॅप्टन अभिमन्यू विजयी झाले होते. मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले होते. आता सोनिया दुहान निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की राज्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.