Sharad Pawar : पक्षातील बंडाळीवर राजीनामा नाट्य, पवारांच्या राजीनामा मागे घेण्यावर शिरसाटांचा टोला
Sanjay Shirsat On Sharad Pawars Resignation back : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत आपण कार्यकर्त्यांच्या भवानांचा आदर करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत आहे पण कोणतंही जबाबदारीचं पद स्वीकारणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले.
त्यानंतर आता त्यांच्या या निर्णयावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावर चांगलीच टोलेबाजी केल्याचं पाहायाला मिळालं. शिरसाट म्हणाले, ‘शरद पवारांनी केलेलं राजीनामा नाट्या हे पक्षातील बंड शमवन्यासाठी केलं होत. त्यातून त्यांनी आपला बडगा दाखवून देत जो कुणी पक्षातील विरोध करत आहे. त्यांना हा धडा होता.’
त्यामुळे असा प्रयत्न पुन्हा कराल तर मी माझा बडगा दाखवेल असा इशाराच त्यांनी जणू यातून दिला आहे. दरम्यान शिरसाट असं देखील म्हणाले आहेत की, जेव्हा शरत पवारांनी राजीनामा दिला. त्यावेळी सुप्रिया सुळेंच्या चेबऱ्यावर कोणताही तणाव दिसत नव्हता. त्यामुळे हे नाटक होतं हे स्पष्ट आहे. अशी प्रतिक्रिया पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
दरम्यान कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. ही घोषणा करताना फ्रेममधील चित्र वेगळं होतं. नेहमी प्रमाणे दिसणाऱ्या दिग्गज नेत्यांऐवजी युवा ब्रिगेड दिसून आली. यामध्ये आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), सक्षणा सलगर (Sakshana Salgar), सोनिया दुहन (Sonia Duhan), धीरज शर्मा आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे युवा नेते शरद पवारांच्या पाठीमागे बसले होते.