Konkan Graduate Constituency Election : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी (Konkan Graduate Constituency) समोर आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक माघार घेतली. यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत मनसेने अभिजीत पानसे यांची उमेदवारी माघारी घेतली. त्यानंतर आज आणखी एक सुखद धक्का भाजपला बसला.
मोठी बातमी! अखेर कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार, भाजपाच्या प्रयत्नांना यश
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी या निवडणुकीत माघार घेत असल्याचे जाहीर केले. संजय मोरे हे ठाण्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते ठाण्याचे माजी महापौर होते. कोकण पदवीधर मतदारसंघातून मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे निवडणूक लढत आहेत. मोरेंच्या उमेदवारीने महायुतीतील भाजप आणि शिवेसनाच आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले होते.
परंतु, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संजय मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. मनसेपाठोपाठ शिवसेनेचाही अर्ज मागे घेतला गेल्याने या निवडणुकीत महायुती एकदिलाने लढत आहे असा संदेश दिला गेला. याआधी मनेसेनेही माघार घेत भाजपाचा मार्ग सोपा केला होता. कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेला मानणारा पदवीधर वर्ग मोठा आहे. जर या मतदारसंघात मनसेने उमेदवार दिला असता तर भाजपाच्या मतांवर त्याचा निश्चित परिणाम झाला असता. त्यामुळे भाजपाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. देवेंद्र फडणवीसांनी सूत्रे हाती घेतली आणि राज ठाकरेंना विनंती केली. त्यांच्या या विनंतीचा मनसेनेही विचार करत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण?
दरम्यान एकीकडे राज्यातील राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला कोणत्याही अटी शर्थींविना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर मतदार संघात उमेदवारही दिला होता. त्याचबरोबर ही उमेदवारी मनसेची महायुती म्हणून असेल तर भाजपच्या येथील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, असे काही घडले नाही.
येत्या 26 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानेही येथे उमेदवार दिला आहे. शिवसेनेकडून संजय मोरे यांनी अर्ज भरला आहे. परंतु, या घडामोडींनंतर मोरे देखील अर्ज मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.