Download App

Lok Sabha Election : माधुरी दिक्षित अन् शेलारांचा नकार, भाजपसाठी उज्ज्वल निकम पर्याय?

North Central Mumbai Lok Sabha Constituency : महायुतीत अनेक मतदारसंघात धुसफूस वाढली आहे. तर काही मतदारसंघात तिकीट कुणाला द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातीलच एक मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघाबाबत भाजपला निर्णय घेता आलेला नाही. भाजप नेते आशिष शेलार त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित यांनी नकार दिल्यानंतर कुणाला तिकीट द्यायचं हा प्रश्न कायम. सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यातूनच आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाव समोर आलं आहे.

MVA Meeting Mumbai : लोकसभेसाठी मविआची 4 तास खलबतं; राऊतांनी सांगितलं आंबेडकरांच्या प्रस्तावाचं गणित

या मतदारसंघासाठी निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. पूनम महाजन यांना विरोध आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यांच्याजागी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. याआधी आशिष शेलार यांना विचारणा झाली होती. परंतु, त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

याआधी अभिनेत्री माधुरी दिक्षित हीला सुद्धा उमेदवारीबाबत विचारणा झाली होती. मात्र तिनेही नकार दिला. त्यामुळे भाजपने निकम यांच्या नावाचा विचार सुरू केला आहे. कारण प्रसिद्ध चेहराच या मतदारसंघातून देण्याचे भाजपाचे नियोजन असल्याची माहिती आहे. उमेदवारीबाबत स्वतः उज्ज्वल निकम किंवा भाजप नेत्यांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. मुंबईतील जागांचा पेच अजून कायम आहे त्यामुळे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात सध्या पूनम महाजन खासदार आहेत. मात्र यंदा त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. या मतदारसंघातून त्यांनी दोनदा विजय मिळवला आहे. याआधी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. आता आगामी काळात या मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us