Download App

“खिशात 70 रुपये असताना 100 कसे खर्च करणार?” शरद पवारांचा अजितदादांना खोचक सवाल

काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.

Sharad Pawar replies Ajit Pawar : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर (Maharashtra Budget) ठेऊन राज्य सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. यातील एकही घोषणा सरकार पूर्ण करणार नाही अशी टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मी काही नवखा नाही असे प्रत्युत्तर अजितदादांनी विरोधकांना दिले होते. या संदर्भात आज पत्रकारांनी शरद पवार यांना (Sharad Pawar) प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी अत्यंत खोचक शब्दांत उत्तर दिले.

विरोधकांनी केलल्या टीकेवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की मी काही आज अर्थसंकल्प सादर करत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी मी काही नवखा नाही. सर्व तांत्रिक आणि कायदेशीर गोष्टींची माहिती घेऊन आणि केंद्र सरकारचं खर्चासंदर्भातील 3 टक्क्यांचं बंधन विचारात घेऊन मी अर्थसंकलप माडंला. आता मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे मी काही नवखा नाही असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

Ashok Saraf: ‘शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम’ अशोक मामांनी सांगितला तो किस्सा

शरद पवार म्हणाले, अर्थसंकल्पातील बाबी आधीबाहेर येता कामा नयेत त्याला अर्थसंकल्प फुटला असे म्हणतात. त्यांनी काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती. या अर्थसंकल्पातील अनेक महत्वाच्या गोष्टी बजेट मांडण्याआधीच बाहेर आल्या होत्या. याचाच अर्थ असा की अर्थसंकल्पाची गुप्तता पाळण्यात आली नाही.

आता राज्यात पुढील तीन महिन्यातच निवडणुका होणार आहेत या निवडणुका डोळ्यांसमोर (Elections 2024) ठेऊन अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. तसेच ज्या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत त्या गोष्टी या बजेटमध्ये सांगण्यात आल्या आहेत. जमा, महसुली तूट आणि निधीची आवश्यकता याचा विचार केला तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे. माझी खात्री आहे की लोकांचा या अर्थसंकल्पावर विश्वास बसणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

यानंतर त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही खोचक टोला लगावला. एखाद्या गोष्टीसाठी मी शंभर रुपये खर्च करणार म्हटलो पण माझ्याकडे फक्च 70 रुपये आहेत तर मग मी शंभर रुपये कसे खर्च करणार. यात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे महसुली जमा किती आहे, त्यानंतर तुमचा खर्च किती होणार आहे आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम जास्त असेल तर फरक कसा भरुन काढणार. या गोष्टींचा विचार न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केला असं जर म्हटलं तर अशा म्हणण्याला काही अर्थ राहत नाही असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.

Ajit Pawar : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् …

follow us

वेब स्टोरीज