Maharashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. यावेळचे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेना (Shiv Sena) आमदारांना व्हीप बजावला आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, की ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करत आहोत. ‘व्हीप’ हा फक्त आमदारांनी उपस्थित राहण्यासाठी बजावला असून दोन आठवडे कोणावरही कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे व्हीपवर आकांडतांडव करण्यात किंवा त्याचा बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही.’
हे सुद्धा वाचा : शिवसेनेच्या आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार; संजय शिरसाटांचा इशारा
अधिवेशनात शिवसेनेचे सर्व आमदार एकत्र बसणार का, या प्रश्नावर सामंत म्हणाले, की केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची, याचा निकाल दिला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित बसणे अपेक्षित आहे. ठाकरे गटाचे आमदार कुठे बसतील याबाबत माहिती नाही. व्हीपबाबत आमचे प्रतोद कुठेही कमी पडणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच कार्यवाही करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार कि मनसेचा आदित्य ठाकरे यांचा सवाल
बाऊ कशाला निर्णय मान्य करा
स्वायत्त संस्थांवर आक्षेप घेणे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला असता तर आयोग फार चांगले. या देशात लोकशाही आहे. जे काही निर्णय झालेत ते काही लोकांनी स्वीकारले पाहिजेत. नुसते आकांडतांडव करण्यात काही अर्थ नाही. स्वायत्त संस्थांचे अधिकार अबाधित ठेवले गेले पाहिजेत.शिवसेना भाजपमध्ये संवाद चांगला आहे.निवडणुकीत चांगले यश मिळवणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
दरम्यान, अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आ. संजय शिरसाट यांनी दिला. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आमचे प्रतोद जो निर्णय घेतील तो ठाकरे गटाच्या आमदारांना बंधनकारक राहणारच आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं. त्यामुळे या मुद्द्यावर दोन्ही गटात वाद वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.