“आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार कि…?” मनसेचा आदित्य ठाकरे यांचा सवाल

  • Written By: Published:
“आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार कि…?” मनसेचा आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला

या निणर्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की “आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार कि स्वाभिमानासाठी आमदारकीवर लाथ मारणार?”

त्यामुळे मनसेकडून ठाकरे गटाला टार्गेट करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. कारण शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदाराच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. याच मुद्यावरून मनसेकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे

हेही वाचा : उद्धवजी धनुष्यबाण जाऊ द्या… जगनमोहन रेड्डी कडे बघा आणि लढा!

दरम्यान निकालानंतर आदित्य ठाकरेंकडून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर ठाकरे गटाला पाठिंबा देणाऱ्या लोकांनी पाठिंबा देणाऱ्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी म्हटलं आहे. की, ‘साहेब आम्ही सदैव एकनिष्ठ तुमच्या सोबत मातोश्री सोबत.’

 

दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. या निकलानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. आता त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हा ट्विटरचा प्रोफाईल फोटो ठेवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube