Download App

‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले गेले अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उलट सवाल करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काल (8 ऑगस्ट) रात्री उशीरा नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र, गोव्याच्या एनडीए खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केले. त्यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसने शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला पंतप्रधानपदाची संधी दिली नाही…. : PM मोदी यांची थेट टीका

शरद पवार यांच्याबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर खासदार राऊत म्हणाले, की अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का, असे आम्ही म्हणालो का, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पवारांबाबत आदर आहे म्हणून त्यांचा पक्ष फोडला का, पंतप्रधान पदापासून पवारांना काँग्रेसने रोखले, मग अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का, असा सवाल राऊत यांनी केला. मोदींनाही आता सामना वृत्तपत्राची दखल घ्यावी लागत आहे. यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचे राऊत म्हणाले.

युती उद्धव ठाकरे यांनी तोडली

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. शिवसेना-भाजपसोबत सत्तेत होती, पण त्यावेळी ‘सामना’तून माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत होते. मात्र आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि आमच्यावर टीका पण करायची आहे, या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? असा सवालही त्यांनी केला.

अनिल गोटेंनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावताच…दोन गट भिडले ! दादांचा गट पडला भारी

शरद पवारांना पंतप्रधानपदावरुन डावललं

गत महिन्यात भोपाळ येथील भाजपच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र काल त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले आणि शरद पवार यांचे कौतुक केले.

Tags

follow us