Ajit Pawar : ‘राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार एकटेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे पाच ते सहा मंत्री भ्रष्ट आहेत. आजही कोकणात टँकर सुरू आहेत. जातीय दंगली तेढ वाढत आहे. महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सरकारने याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जनतेला तुमच्या नौटंकीचे काहीच देणेघेणे नाही. हे सरकार सत्तेत एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी आले, की लोकाभिमुख कारभार करण्यासाठी आले?’, राज्य सरकारचा ढिसाळ कारभार सुरू आहे. भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे समोर येत आहेत. बदल्यांसाठी पैसे घेतले जातात. याआधी महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते. याची राज्याला जबरदस्त किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? अजितदादांनी दिला महत्वाचा अपडेट
अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘राज्य सरकारचा ढिसाळ कारभार सुरू आहे. भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे समोर येत आहेत. बदल्यांसाठी पैसे घेतले जातात. याआधी महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते. याची राज्याला जबरदस्त किंमत मोजावी लागत आहे. सरकार बेकायदेशीर आहे का हा संशोधनाचा भाग आहे. उद्या अधिवेशन आहे. आवाज उठवणार आहे. आज राज्यात पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात कमी पडत आहे. घटना थांबत नाहीत. गृहमंत्रालयाचे प्रमुख कमी पडत असतील तर राजीनामा मागण्याचा अधिकार लोकांना विरोधकांना आहे.’
मी जे बोललो त्यात काय चुकलं
‘लोकांनी याआधीच्या पंतप्रधानांचा करिश्मा पाहिला. इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांचा करिश्मा होता. इंदिरा गांधींना तर जनतेने पराभूतही केले होते. पण, नंतर पुन्हा त्यांचे सरकार आले. तसेच 2014 मध्ये भाजप सत्तेवर आला तो मोदींचा करिश्मा देशात चालला. जिथे कधीच भाजप निवडून येत नव्हता तेथेही भाजप निवडून आला. यात मी काय चुकीचं बोललो’, असे पवार म्हणाले.
‘फेव्हिकॉल हा ओरिजनल असावा…’; भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
मोदी-शहांनी ग्रीन सिग्नल दिला तर..
‘आमचं सरकार असताना प्रश्न असताना आम्हीही दिल्लीला जात होतो. तसे आता दिल्लीतल्या वरिष्ठांनी या दोघांना (एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस) मु्ख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केले आहे, हे जगजाहीर आहे. कदाचित आता ते जाहिरातबाजीवर समन्वय काढण्यासाठी जात असतील, असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कदाचित मोदी शहांकडून ग्रीन सिग्नल मिळाला की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’, असे पवार म्हणाले.