‘फेव्हिकॉल हा ओरिजनल असावा…’; भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला

‘फेव्हिकॉल हा ओरिजनल असावा…’; भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला

Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीमुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका जाहिरातीमुळे या सरकारमध्ये कुठं काही घडेल, इतकं हे सरकार तकलादू नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तर सीएम एकनाथ शिंदे यांनी आमची15-20 वर्षांपासून मैत्री आहे. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, असं सांगत या वादावर पडदा टाकला. शिंदे यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी फेव्हिकॉल हा खरा असला, नाहीतर सांधे तुटतात, अशी टीका केली. (The fevical must be true, or the joints break; Bhujbal’s criticism of Shinde-Fadnavis)

छगन भुजबळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी रखडलेल्या मंत्रिमंडळावर भुजबळांना विचारलं. त्यावर उत्तर देतांना भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, केला जाणार आहे, हे आपण वर्षभर ऐकतोय. जेव्हापासून शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं, तेव्हापासून ते हेच सांगत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार करा, अथवा करू नका. पण, आपापसात जाहिरातीच्या माध्यमातून जो कलगीतूरा लागलाय ते तरी करू नका. पहिली जाहिरात केल्यानंतर भाजपचे लोक नाराज झाले. मग त्यांनी फडणवीस आणि भाजपची नाराजी दूर करण्यासाठी दुसरी जाहिरात दिली. ह्या जाहिराती कोणं देतं आहे, याची कल्पना नाही. पण, यामुळं पक्षाचे कार्यकर्ते दुखावले जातात. शिवाय, जनतेची कामेही बाजुला राहतात. ते सांगतात आमची फेव्हिकॉलची जोडी आहे. फेविकॉल हा ओरिजनल असला पाहिजे, डुप्लिकेट असेल तर सांधे तुटतात, असा खोचक टोला भुजबळ यांनी लगावला.

मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात 

मंगळवारी (ता. 13) महाराष्ट्रातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात छापून आली. ‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात होती. या जाहिरातीमुळं भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. त्यानंतर एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी आमचं बॉन्डिंग तुटणार नाही, ही फेव्हिकॉल लावलेली जोडी आहे, असं सांगितलं. त्यानंतर आता भुजबळ यांनी फेव्हिकॉल हा ओरिजनल असावा, असा खोटक टोला लगावला. त्यावर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येत हेच पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्यचा महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यावरही भुजबळ यांनी भाष्य केलं. आपण थोडं सयंमाने वागलं पाहिजे. कार्यकर्ते फोटो जसे फोटो ठेवतात, तसे हार घातले जातात. शाई फेक होऊ नये. महिलांच्या बाबतीत तर असे होऊच नये, असं ते म्हणाले.

कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर बोलतांना दिल्या घरी सुखी राहा, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube