Download App

‘माझ्या जावयाला अडकवण्याचा सरकारचा प्लॅन, ज्यांच्याशी जमलं नाही त्यांनीच’.. खडसेंचा घणाघात

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावयाबद्दल धक्कादायक विधान केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. सरकारकडून माझ्या जावयाला विनाकारण त्रास देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या जावयावर भोसरी खंडातील भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले.

ते म्हणाले, मी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझ्यामागे जमिनीचे प्रकरण लावण्यात आले. यात काहीच तथ्य नाही. व्यवहार झालेला नाही. त्या ठिकाणी जमीन सरकारच्या मूल्यांकनानुसार 23 कोटी रुपयांनाच खरेदी करण्यात आली. स्टँप ड्यूटी भरण्यात आली.

जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान…सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी

उताऱ्यावरही मूळ मालकाचेच नाव होते. त्यामुळे या प्रकारात काहीच तथ्य नाही. माझाही त्याच्याशी काही संबंध नाही असा अहवाल एसीबीने कोर्टात सादर केला.
नंतर जो एफआयआर दाखल करण्यात आला तो दोन तीन वर्षे पडूनच राहिला.

नंतरच्या कालखंडात मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तो जुना अहवाल उकरून काढण्यात आला. आणि माझ्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली. वास्तविक जर एसीबीने सी समरी दाखल केला होता तर ईडीची काय गरज होती. राजकीय सूडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. माझ्या जावयाचा तर याच्या काडीचाही संबंध नाही. तो मुंबईत आयआयटीचा विद्यार्थी आहे बावीस वर्षांपूर्वीचा. त्याची चांगली नोकरी आहे.

जमिनीचा व्यवहार त्याने त्याच्या खात्यातून पैसे काढून दिलेला आहे. कुठलेही पैसे जमा केलेले नाहीत. कोणत्याही एजन्सीकडून पैसा आणलेला नाही. अशा स्थितीत त्याला विनाकारण अडकवणे. त्याला जामीन मिळू न देणे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारी यंत्रणांकडूनही यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. हा सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग आहे. हेतूपुरस्सर जाणीवपूर्वक छळ करण्याचा हा प्रयत्न आहे.

‘हे विसरू नका उद्धव ठाकरे तुमचे हेडमास्तर होते; भुजबळांचा गुलाबरावांना टोला

खडसेंचा रोख कोणाकडे ? 

माझे जावई मुंबईतील आयआयटीचे विद्यार्थी होते. ते उद्योजक आहेत. सरकारकडून उद्योजकांना छळण्याचा प्रकार सुरू आहे. जे माझे राजकीय विरोधक आहेत. अलीकडच्या कालखंडात ज्या नेत्यांशी माझे जमले नाही ते या प्रकरणात उघडअघड यंत्रणांवर दबाव आणत असल्याची माझी माहिती आहे.

Tags

follow us