Download App

भाजप नेत्यांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सुप्रिया सुळेंना एकाच शब्दांत दिले उत्तर

Supriya Sule : राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली जात आहे. यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे. या मुद्द्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया दिली. आज खासदार सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजप नेत्यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर सुळे यांनी या जास्त भाष्य करणे टाळले. सुसंस्कृतीचा भाग आहे त्यांच्या इतक्याच मोजक्या शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ठाकरेंच्या पॉडकास्टची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले, त्यांचं फक्त फेसबुक लाईव्ह…

याआधी शरद पवार यांनी स्वतः देखील यावर प्रतिक्रिया देत त्यांना कशाला महत्व देता असे म्हटले होते. त्यानंतर आज खासदार सुळे यांनी देखील जास्त महत्व न देता मोजक्या शब्दांत विरोधकांना सुनावले. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांच्यावर भाजप नेते ज्यावेळी अशी टीका करतात तेव्हा फक्त अजित पवारच त्यांना प्रत्युत्तर देत असतात. बाकीचे नेते काहीच बोलत नाहीत, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

यांचे सरकार आले अन् दंगे वाढले

गृहविभागाचा इंटेलिजन्स विभाग असतो. हा विभाग गृहमंत्रालयाला अहवाल देत असतो. यात नक्कीच काहीतरी गडबड होत आहे. यांचा इंटेलिजन्स विभागाने गृहमंत्रालयाला इशारा दिला पण, गृहविभागाने पुढे काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षांवर आरोप करू शकत नाही. गृह मंत्रालय स्वतःच्या जबाबदारीतून पळ काढत आहे. यांचा इंटेलिजन्स विभागाचा रिपोर्ट यांना काही माहिती देत नाही का. जसे यांचे सरकार आले आहे दंगेच होत आहेत. याआधी कधीही इतक्या दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे हे सगळे गृहमंत्रालयाचेच अपयश आहे.

Tags

follow us