संभाजी भिडेचा तत्काळ बंदोबस्त करा; ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचा संताप

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने गदारोळ उठला आहे. काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांनी विधीमंडळात तीव्र संताप व्यक्त केला. संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही संताप व्यक्त संभाजी भिडेचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, […]

Balasaheb Thorat And Sambhaji Bhide

Balasaheb Thorat And Sambhaji Bhide

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने गदारोळ उठला आहे. काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांनी विधीमंडळात तीव्र संताप व्यक्त केला. संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही संताप व्यक्त संभाजी भिडेचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला. एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल.

वाद पेटला! संभाजी भिडेंना IPC 153 अंतर्गत अटक करा; पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक

संभाजी भिडेंना अटक करा – पृथ्वीराज चव्हाण

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज (दि. 28) विधानसभेतही उमटले. भिंडेंनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदाजनक असे असून, त्यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हण यांनी केली आहे.

Exit mobile version