वाद पेटला! संभाजी भिडेंना IPC 153 अंतर्गत अटक करा; पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक

  • Written By: Published:
वाद पेटला! संभाजी भिडेंना IPC 153 अंतर्गत अटक करा; पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक

मुंबई : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज (दि. 28) विधानसभेतही उमटले. भिंडेंनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदाजनक असे असून, त्यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हण यांनी केली आहे. (Congress Leader Pruthviraj Chauvhan Aggressive On Sambhaji Bhide Statement)

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत; वाचा कुणाला किती रक्कम मिळणार

चव्हाण म्हणाले की, भिंडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेले विधान अत्यंत निंदनीय आणि वादग्रस्त असून, सरकारने तातडीने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, तसेच त्यांना IPC 153 अंतर्गत अटक करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. संभाजी भिडे यांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणार आहे. अशा व्यक्तीला सरकारने ताबडतोब अटक करावी.

Ram Shinde : ‘मी लढणार, 2024 ला दाखवूनच देणार’; शिंदेंचा पवारांविरुद्धचा प्लॅन ठरला!

हा माणूस बाहेर फिरू कसा शकतो?

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून भिडे नावाचे गृहस्थ समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यानंतर आत त्यांनी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. अशा प्रकारची वादग्रस्त विधाने करणारी व्यक्ती बाहेर फिरूच कशी शकते असे म्हणत भिडेंना IPC 153 अंतर्गत त्वरीत अटक करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, चव्हाण यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भिडेंच्या विधान तापसून योग्य ती कारवाई केली जाईल असे उत्तर दिले आहे. परंतु, भिडेंच्या या विधानामुळे येत्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube