Download App

‘पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच पण, संख्याबळावर ठरणार नाही’; फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

Devendra Fadnavis Comment on Future CM of Maharashtra : राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात आहे. याला ट्रिपल इंजिनचं सरकारही नेतेमंडळी म्हणतात. सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असले तरी कधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर कधी अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील अशा चर्चा ऐकू येतात. हा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो असे सांगत दोन्ही नेते नेहमीच वेळ मारून नेतात. आताही मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिले असेल. राज्यात पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच असेल असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकर्ते देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार असे सांगतात. एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं सांगतात आणि अजित पवार यांचे कार्यकर्तेही अजितदादा मुख्यमंत्री होतील असं सांगतात. या गोष्टी संख्याबळावर ठरणार असल्या तरी महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

Devendra Fadnavis : मनसे-भाजप युती होणार का? फडणवीस म्हणाले, आमची राज ठाकरेंबरोबर…

यावर फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. संख्याबळ वगैरे आम्ही काही ठरवलेलं नाही. संख्याबळ आमचंच जास्त असणार यात कुणाच्याच मनात शंका असण्याचं कारण नाही. पण, फक्त संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही. कारण, आता आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. आमचे वरिष्ठ नेते तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या माझा नेता मोठा झाला पाहिजे हेच कार्यकर्त्यांचं मोटिव्हेशन असतं. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं म्हटलं जातं त्यावेळी माझ्या पक्षाच्या लोकांना आनंद होतो.

पण जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांसमोर जर मोठ्याने भाषण करून सांगितलं की आपल्याला अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचंय. टाळ्या तर वाजतील पण कमीच वाजतील ना. तो उत्साह येणार नाही. ज्याच्या त्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांचेच नेते मु्ख्यमंत्री व्हावेत असेच वाटेल. पण आम्ही तिन्ही पक्षांचे नेते याचा एकत्रित निर्णय करू यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची मोठी भूमिका असेल, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis : आगे आगे देखो होता है क्या, चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचं सूचक वक्तव्य

follow us