Download App

राज्यातील जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न जाहीर, मुंबई ‘नंबर वन’वर, तर मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे पिछाडीवर…

महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७८,६८१ रुपये आहे, तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न १,८८,८९२ रुपये आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra per capita income: विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, दरडोई उत्पन्नाच्या (Per capita income) बाबतीत राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी मराठवाड्याती (Marathwada) सर्वाधिक जिल्हे हे खालच्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७८,६८१ रुपये आहे, तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न १,८८,८९२ रुपये आहे.

Priyadarshini Indalkar : निळ्या कॉटन साडीत प्रियदर्शिनी कडक अन् मादक अंदाज… 

राज्यात ३६ जिल्हे असले तरी, पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा गृहीत धऱण्यात आला. तर ठाणे, पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्रित दरडोई उत्पन्न दाखवले आहे.

मराठवाड्यातील जिल्हे पिछाडीवर
अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यातील १२ जिल्हे हे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली आहेत. यामध्ये मराठवाड्यातील आठ पैकी पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. ३४ जिल्ह्यांमध्ये नांदेड २५ व्या, जालना २६ व्या, बीड २७ व्या, परभणी २८ व्या आणि हिंगोली ३० व्या क्रमांकावर आहे.

कोकणचे उत्पन्न चांगले…
तर देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली असलेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली आणि वाशीम यांचा समावेश आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचे सरासरी दरडोई उत्पन्नही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील कोणताही जिल्हा देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाही.

डॉक्टर पांढरा आणि वकील काळा कोट का घालतात? माहितीये का, वाचा सविस्तर… 

महाराष्ट्राच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, ठाणे (पालघरसह), पुणे, नागपूर, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे, तर नंदुरबार सर्वात शेवटी आहे.

सर्वांत जास्त दरडोई उत्पन्न ४,५५,७६७ हे मुंबईचे आहे, तर खालोखाल ठाणे (पालघरसह) ३,९०,७२६ रुपये आहे, पुणे ३,७४,२५७ रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा ३,२२,९२७ रुपये आहे.

राज्याच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेले जिल्हे
१) मुंबई – ४,५५,७६७
२) ठाणे – ३,९०,७२६
३) पुणे – ३,७४,२५७
४) नागपूर – ३,२२,९२७
५) रायगड- ३,१५,६८१
६) कोल्हापूर – २,८२,२९७
७) सिंधुदुर्ग – २,७९,०८०

राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेले जिल्हे
८) सांगली – २,५८,५५७
९) सोलापूर – २,५३,०८८
१०) नाशिक – २,४९,०००
११) रत्नागिरी – २,४५,४२१
१२) सातारा – २,४१,३६९
१३) छत्रपती संभाजीनगर – २,३५,६७७
१४) अहिल्यानगर – २,३०,८१९
१५) वर्धा – २,२५,६९१
१६) चंद्रपूर – २,२१,८४६
१७) अकोला – १,९७,३३४
१८) भंडारा – १,९३,४१८
१९) लातूर – १,९३,१५२
२०) अमरावती – १,९१,४०१
२१) धाराशिव – १,९०,३८३
२२) धुळे – १,८९,३८४

राष्ट्रीय सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असलेले जिल्हे
२३) गोंदिया – १,८३,४१४
२४) जळगाव – १,८२,६९६
२५) नांदेड – १,८१,०१३
२६) जालना – १,७८,३२९
२७) बीड – १,७७,२४०
२८) परभणी – १,७५,७५८
२९) यवतमाळ – १,६०,०८८
३०) हिंगोली – १,४७,३३३
३१) गडचिरोली – १,४०,८६०

३२) बुलढाणा – १,३७,२३५
३३) वाशिम – १,३४,७५४
३४) नंदुरबार – १,२९,१४६

follow us