महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करणार निकालपत्राचे वाचन

Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा उद्या (दि.11) सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय […]

Supreme Court D Chandrachud

Supreme Court D Chandrachud

Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा उद्या (दि.11) सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत.

कर्नाटक विधानसभा त्रिशंकू?, कुमारस्वामी असणार किंगमेकर

आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या पुन्हा भूकंप येणार का? ते उद्याच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण राज्याच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी निकालाचं वाचन होणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निकालाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात निकालाचं वाचन ज्यावेळी होईल तेव्हा त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला निकाल जाहीर होईल तेव्हा सर्व घडामोडी टीव्हीवर लाईव्ह दिसणार आहे. यावेळी निकालाचं वाचन नेमकं कोण करणार? याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. या याचिकांबद्दल उद्या निकाल जाहीर होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झाली. त्यामुळे निकाल नेमकं कोण वाचणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पाच न्यायाधीशांचं एकमत नसेल तर वेगळ्या शक्यता निर्माण होऊ शकतात. 5 पैकी 2 न्यायाधीशांचे मत वेगळं असेल तर बहुमताचा विचार करुन निकाल दिला जाईल. पण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावेळी तशी घटना घडण्याची शक्यता कमी आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत सर्व पाचही न्यायाधीशांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे एकच न्यायाधीश या निकालाचं वाचन करणार आहेत. न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये स्वत: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहेत. तेच या निकालाचं वाचन करणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटनुसार सर्व न्यायाधीशांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version