कर्नाटक विधानसभा त्रिशंकू?, कुमारस्वामी असणार किंगमेकर
Karnataka Assembly Exit Poll : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी आज मतदान झाले. यामध्ये अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. 224 जागांसाठी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. कर्नाटक विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. यामध्ये जेडीएस (JDS) पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत येणार असल्याचे दिसून येत आहे.
वेगवेगळ्या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. झी न्यूज, एबीपी सी व्होटरने काँग्रेसला 100 ते 118 जागा दाखवल्या आहेत. तर ‘जन की बात’ आणि न्यूज नेशनने भाजपला सर्वात जास्त जागा दाखवल्या आहेत. या दोन्ही ‘जन की बात’ने भाजपला 94 ते 117 अशा जागा दाखवल्या आहेत तर न्यूज नेशनने 114 जागा दाखवल्या आहेत. या एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दाखवलेले नाही.
Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष पण…
त्यामुळे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षात काटे की टक्कर दिसून येत आहे. यात जेडीएसला सरासरी 21 ते 30 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे त्रिशंकु विधानसभेत जेडीएसची साथ असणारा पक्ष सत्तेत येऊ शकतो असे या एक्झिट पोलनुसार दिसून येत आहे. त्यामुळे जेडीएसचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांना महत्व येणार असून सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे राहतील असे दिसून येत आहे. गेल्यावेळी देखील कर्नाटकची विधानसभा त्रिशंकु झाली होती. त्यावेळी देखील काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. जेडीएस च्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. पण काही काळानंतर भाजपने ऑपरेशन लोटस राबवत काँग्रेस-जेडीएस सरकार पाडले होते.
एक्झिट पोलनुसार जाणून घ्या कर्नाटकात कोणाचं सरकार बनतंय?
झी न्यूज –
पक्ष जागा
भाजप – 79-94
काँग्रेस – 103-118
जेडीएस – 24-32
अन्य – 02-06
एबीपी-सी व्होटर
पक्ष जागा
काँग्रेस -100-112
भाजप – 83-95
जेडीएस – 21-29
अन्य – 2-6
जन की बात
पक्ष जागा
काँग्रेस – 91-106
भाजप – 94-117
जेडीएस – 14-24
अन्य – 0-2
न्यूज नेशन-सीजीएस
पक्ष जागा
काँग्रेस – 86
भाजप – 114
जेडीएस – 21
अन्य -03
रिपब्लिक PMARQ
पक्ष जागा
काँग्रेस – 94-108
भाजप – 85-100
जेडीएस – 24-31