गडचिरोली : वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या कन्येला दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहेरी येथील जनसन्मान यात्रेत बोलत होते.
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा तपास CBI कडे वर्ग, मुंबई उच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक…
चूक भूल करू नका, बापासोबत राहा…
यात्रेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, चूक भूल करू नका, बापासोबत राहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते, असा सल्लाही अजितदादांनी आत्राम यांच्या कन्येला दिला. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मला त्यांना एकच सांगायचे आहे की, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. त्यामुळे वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असे अजित पवार म्हणाले. समाजाला घरफोडीचं राजकारण आवडत नाही. त्यासंदर्भात आम्हीदेखील अनुभव घेतलेला असल्याचेही अजित पवार म्हणाले.
जयंत पाटलांनी टेन्शन वाढवलं! देवेंद्र फडणवीस अन् शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत संवाद?
जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार
अहेरी येथील यात्रेला संबोधित करताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. विरोधक मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार असा सवाल अत्राम यांनी यावेळी केला. माझी खुर्ची घेण्याचा जे प्रयत्न करतील त्यांना मी बाजूला करणार आहे. मी काम करणारा माणूस आहे. सातत्याने कामच करत आलो आहे. पण आता हे मध्येच येऊन असं काही करणार असतील तर त्यांनी वाटी लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
video : शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे… भाजप आमदार पडळकरांची घणाघाती टीका
आत्राम घराणं हलगेकर यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही
एक मुलगी गेली तरी चालेल. आणखी एक मुलगी माझ्याकडे आहे. मुलगाही आहे. एक भाऊ विरोधात गेला तो सुद्धा आता माझ्यामागे उभा राहिला आहे. इतकंच नाही तर माझ्या चुलतभावाचा मुलगा सुद्धा आता माझ्या सोबत आहे. त्यामुळे आता पूर्ण आत्राम घराणं एकत्र झालं आहे. त्यामुळे आता आत्राम घराणं हलगेकर (मुलगी आणि जावई) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे आत्राम म्हणाले.