बारामती : काही दिवसांपूर्वी लोकसभेला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर सर्वात मोठी घडामोड समोर आली असून, खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) विधानसभेत बारामतीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी (दि.3) बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपला; अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला राम-राम, तुतारी फुंकली
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम कारवं असे अजितदादांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. लोकसभेला आमच्या परिवारातील जेवढी लोक तुम्हाला भेटायला येत होती. तेवढी यावेळी जास्त कुणी येणार नाही असेही अजित अजित पवार म्हणाले. उलट मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराचं काम कारवं असे पवार म्हणाले. आता हा आमदार कसा निवडून द्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. अजित पवारांच्या वरील आवाहनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असता अजितदादांनीया सर्वांची समजूत काढली. ते म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णयानंतर आपण सर्व स्पष्ट करू असे कार्यकर्त्यांना अजितदादांनी सांगितले.
शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत केलं मोठं वक्तव्य, ‘ही’ मागणी करत पाठिंबा केला जाहीर
कुणाला तिकीट मिळणार?
अजित पवार यांनी बारामतीमधून माघार घेतल्यास येथून अजित पवार यांच्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे. त्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि आणि जय पवार यांची नावं चर्चेत आहेत. त्यातही जय पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून येथे युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे बारामती विधानसभेतही पवार विरुद्ध पवार अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.