सुनेत्रा पवारांना उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाचा; अजित पवारांचा मोठा खुलासा
Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. सुनेत्रा पवारांना निवडणूक आणण्यासाठी अजित पवार गटाने जोर लावला होता. पण तरीही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. दरम्यान, सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) बारामतीमधून निवडणूक लढवायला सांगणं ही आपली चूक होती, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर आता अजित पवारांनी आणखी एक विधान केल.
Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? अजितदादांनी दिलं ‘हे’ उत्तर
अजित पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांना बारामतीची निवडणूक लढवण्यास सांगणं ही चुक होती, या वक्तव्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, पत्नीला उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाने घेतला. आमच्याकडे फक्त चार जागा होत्या. त्यानंतर आम्हाला परभणीची जागा सोडावी लागली. धाराशिवची जागा घेतली. मात्र तिथं महायुतीचे आमदार होते. राष्ट्रवादीचे नाही, असे अजित पवार म्हणाले.
चिमणराव पाटील ठाकरेंच्या हिटलिस्टवर; गेम करण्यासाठी शिवसैनिकही तयार!
सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांनी उभं करणं ही चुक होती, यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, याविषयी विचारलं असता ते म्हणाले, पक्षातील सर्वांना माझा स्वभाव माहीत आहे. मला माझ्या कुटुंबाबाबत बोलण्याचा अधिकार आहे. कुटुंब म्हणूनच मी हे विधान केलं. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये. माझी विनंती आहे की, माझं विधान चुकीच वाटत असेल तर त्यावर अधिक विचार करू नये. तो आमचा कौटुंबिक मामला आहे. मला जे काही सांगायचं ते सांगितलं, असं अजितदादा म्हणाले.
बारामतीत जे घडलं त्याला मीच जबाबदार…
ते म्हणाले, सुनेत्रा पवारांनी उभं करणं ही चुक होती, हे म्हणालो. माझ्या मनात जे येतं, ते मी बोलतो. मी 35 वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्या निर्णयाचा मी निवडणुकीनंतर खूप विचार केला. हे कसं घडले? का घडलं? त्याला मीच जबाबदार आहे. मी कोणाला दोष देत नाही. मी हे करायला नको होते, बारामतीत मी घेतलेला निर्णय कुटुंबासाठी चुकीचा होता. , असे अजित पवार म्हणाले.