चिमणराव पाटील ठाकरेंच्या हिटलिस्टवर; गेम करण्यासाठी शिवसैनिकही तयार!

चिमणराव पाटील ठाकरेंच्या हिटलिस्टवर; गेम करण्यासाठी शिवसैनिकही तयार!

कायमच विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणारा मतदारसंघ अशी एरंडोल-पारोळाची ओळख. गेल्या तीन दशकांपासून प्रवाहाविरोधात जाऊन इथले मतदार मतदान करत आलेले आहेत. 1990 साली एरंडोलमधून शिवसेनेचे हरी महाजन निवडून आले. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन झाले होते. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने लाट असताना एरंडोलवासियांनी जनता दलाचा (Janata Dal) आमदार निवडून दिला होता. 1999, 2004 आणि 2009 या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा (Shivsena) आमदार निवडून आला पण राज्यात शिवसेना-भाजपचे सरकारी येऊ शकलो नाही. 2014 मध्ये मोदी लाटेत अनेक आमदार भुईसपाट होत असताना जिल्ह्यात विरोधी पक्षातील एकमेव डॉ. सतीश पाटील निवडून आले. (Amol Patil vs. Harshal Mane can be contested from Parola Assembly Constituency)

तीन दशकांचा या ऊन पावसाच्या खेळाला ब्रेक लागला तर 2019 मध्ये. या निवडणुकीमध्ये एरंडोलवासियांनी प्रथमच सत्तेच्या बाजूने मतदान केले. चिमणराव पाटील 18 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आणि पाच वर्ष ते सत्ताधारी पक्षातही राहिले. सुरुवातीच्या अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि त्यानंतर अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांच्यासोबत. याचा लाभही पाटलांनी उचलला. याबद्दलचे उदाहरण देताना ते सांगतात की स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1947 ते 2019 या काळात तालुक्यात राबवल्या गेलेल्या पंचवार्षिक योजनांचा निधी एका बाजूला आणि 2019 ते 2024 या पाच वर्षात तालुक्याला मिळालेला निधी एका बाजूला आहे. याच सगळ्या कामाच्या जोरावर चिमणराव पाटील यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. पण पाटील यांना तिकीट मिळवणे आणि निवडून येणं वाटतं वाटत तेवढं सोपं नाही.

लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहुया चिमणराव पाटील यांच्यापुढे नेमकी काय आव्हाने आहेत…

सत्तारूढ महायुतीतील शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेत ज्येष्ठ असून देखील पक्षाने त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवले. पण यानंतर देखील त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून मुख्यमंत्री शिंदे यांना खंबीरपणे साथ दिली आहे. त्याल्यामुळे त्यांची किंवा त्यांच्या मुलाची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. पण इथे चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जास्त सख्य नसल्याने गुलाबराव काय भूमिका घेतात यावरही चिमणराव यांचे तिकीट अवलंबून असणार आहे.

घुलेंचा आमदारकीचा चंग.. प्रतापराव, मोनिकाताई टेन्शनमध्ये

याशिवाय लोसभेचे तिकीट नाकारलेले माजी खासदार ए. टी. नाना पाटील, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, नुकतेच पक्षात आलेले माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे भाजपकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातर्फे यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटीलही निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. महायुतीतील तीनही घटक पक्षातील निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या तीनही उमेदवारांनी पूर्वतयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीतही काही वेगळी स्थिती नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे एक सूत्र ठरले आहे. ज्याचा आमदार त्याची ती जागा. या सूत्रानुसार ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटू शकते. या पक्षाकडूनही दोन वर्षापासून जोरदार तयारी करण्यात येत आहे. बंडखोरी केलेल्या चिमणराव पाटील यांना पाडायचंच या उद्देशाने इथले शिवसैनिक पेटलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने तयारी करत आहेत. तर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि लोकसभेला उमेदवारी केलेले करण पवार पाटीलही निवडणुकीच्या निकालानंतर दावा करू लागले आहेत.

करण पवार पाटील यांना उमेदवारी द्यायची झाल्यास काही गोष्टींचा विचार होऊ शकतो. यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेमध्ये त्यांना पारोळ्यामधून मिळालेल्या मतांचाही विचार होऊ शकतो. हा मतदारसंघ म्हणजे करण पवार यांचा तालुकाच. इथे त्यांना 22 हजार मते स्मिता वाघ यांच्यापेक्षा कमी मिळाली आहेत. ते पारोळा नगरपालिकेचे सात वर्षे नगराध्यक्ष होते. तरी तिथे करण पाटलांना इतकी कमी मते मिळावीत, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Nashik : लोकसभेला हवा फिरली… विधानसभेला नाशिक भाजपच्या हातून जाणार?

इथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून करण पवार यांचे काका आणि माजी मंत्री सतीश पाटील यांचाही भक्कम दावा आहे. वेळ पडल्यास ते अपक्ष मैदानात उडी घेऊ शकतात असं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर त्यांनी भेटीसाठीचा कार्यक्रमही सुरू केला आहे. मात्र जर करण पवार यांना उमेदवारी मिळाल्या ते पुतण्या विरुद्ध रिस्क घेणार का? हा प्रश्न उरतो. नदीजोड प्रकल्प आणि पालकमंत्री असताना केलेली कामे यामुळे सतीश पाटील यांची एक स्वतःची अशी एक प्रतिमा जनतेत आहे.

थोडक्यात मतदारसंघाचा थोडा कानाचा घेतल्यास सद्यस्थितीत इथे शिवसेनेचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील अथवा त्यांचे पुत्र अमोल पाटील विरुद्ध हर्षल माने किंवा करण पवार पाटील असा सामना रंगू शकतो. तर सतीश पाटील हे अपक्ष मैदानात उडी घेऊ शकतात असे चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? पारोळा एरंडोल मतदारसंघातून तिकिटात महाविकास की महायुती कोण बाजी मारेल? आणि यातील प्रत्यक्ष मतदानातून कोण विजयी होईल? तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube