Download App

एक फोन अन् विधानपरिषदेतून माघार; 2019 बाबत पंकजांचा गौप्यस्फोट!

Pankaja Munde : मला अनेकदा डावलण्यात आलं पण मी कधीच नाराजी व्यक्त केली नाही. 2019 मध्ये विधानपरिषद निवडणुकांसाठी तयार करा असे मला सांगण्यात आले होते. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दहा मिनिटे आधी थांबण्यास सांगितले गेले, असा गौप्यस्फोट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. मात्र ऐनवेळी निवडणुकीत माघार घेण्यास कुणी सांगितले याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. पक्षाने त्यावेळी मला जो आदेश दिला तो मी पाळला असंही मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर मते व्यक्त केली. त्या म्हणाल्या, सध्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चांमुळे मला वाईट वाटतं. या चर्चांचा मला कंटाळा आला आहे. त्यामुळे या राजकारणातून मी आता दोन महिने ब्रेक घेणार आहे. सामाजिक काम मात्र सुरुच राहिल, असे मुंडे म्हणाल्या.

ठाकरे गट अन् सुळे गट आगामी निवडणुका पंजाच्या निशाणीवर लढवणार; नितेश राणेंचा टोला

दोन महिने घेणार ब्रेक 

मुंडे पुढे म्हणाल्या, 2019 पासून सुरू असलेल्या चर्चांमुळे मी आता थकले आहे. जनतेबरोबर काय होतेय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ते मी आता करणार आहे. ब्रेक घेऊन यावर विचार करणार आहे. पण मी समाजसेवेतून मात्र सुट्टी घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडेंनी आज का ट्विट केलं याचं उत्तर तेच देतील 

मंत्रीमंडळाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते. आपल्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांचे औक्षण केले. चार ते पाच दिवसांपूर्वी ते भेटले होते. मंत्रीपद मिळाल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन देखील केले. पण, त्यांनी आज का ट्विट केलं याचं उत्तर तेच देतील, असेही मुंडे म्हणाल्या.

Tags

follow us