Download App

भाजपचा पॉवर गेम! जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का, नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग

Maharashtra Politics : लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली असून पुन्हा एक मोठा डाव टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.

भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे, असे बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Eknath Shinde : बैठक NDA ची पण चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेची…

या यादीत अनेक फेरबदल झाल्याचे दिसत आहे. तर नव्या चेहऱ्यांना पुढे आणले आहे. नागपूर शहराध्यक्षपदासाठी बंटी कुकडे तर जिल्हाध्यक्षपदासाठी सुधाकर कोहळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एका जिल्ह्यात दोन ते तीन अध्यक्ष दिले आहेत.

नगरमध्ये जुन्या नेत्यांवर विश्वास 

यामध्ये पुणे शहर- धीरज घाटे, पुणे ग्रामीण (बारामती) – वासुदेव काळे, पुणे (मावळ) – शरद बुट्टे पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. अहमदनगर शहराध्यक्षपदी अॅड. अभय आगरकर, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशी आहे यादी

सुनील गफाट (वर्धा), प्रकाश बाळबुधे (भंडारा), अॅड. यशुलाल उपराळे (गोंदिया), प्रशांत वाघरे (गडचिरोली), राहुल पावडे (चंद्रपूर शहर), हरिश शर्मा (चंद्रपूर ग्रामीण), गणेश मांटे (बुलढाणा), सचिन पंजाबराव देशमुख (खामगाव), जयंत मसने (अकोला शहर), किशोर मांगटे (अकोला ग्रामीण), श्याम बढे (वाशिम), प्रविण पोटे (अमरावती शहर), डॉ. अनिल बोंडे (अमरावती ग्रामीण), तारेंद्र बोर्डे (यवतमाळ), महादेव सुपारे (पुसद).

दिलीप कंदकुर्ते (नांदेड शहर), सुधाकर भोयर (नांदेड उत्तर), संतुकराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), राजेश देशमुख (परभणी शहर), संतोष मुरकुटे (परभणी ग्रा.), फुला शिंदे (हिंगोली), बद्री पठारे (जालना ग्रा), शिरिष बोराळकर (छत्रपती संभाजीनगर).

सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र

सुहास सिरसाट (संभाजीनगर उत्तर), संजय खांबायते (संभाजीनगर दक्षिण), देविदास काळे (लातूर शहर), दिलीपराव देशमुख (लातूर ग्रा), संताजीराव चालुक्य (धाराशिव)

अॅड. हर्षल पाटील (भिवंडी),किशोर शर्मा (मिरा भाईंदर), संदीप नाईक (नवी मुंबई), नरेंद्र सूर्यवंशी (कल्याण), प्रदीप रामचंदानी (उल्हासनगर), महेंद्र पाटील (वसई विरार),भरत राजपूत (पालघर), प्रभाकर सावंत (सिंधुदुर्ग), केदार साठे (रत्नागिरी उत्तर), राजेश सावंत (रत्नागिरी दक्षिण), अविनाश कोळी (रायगड उत्तर), धैर्यशील पाटील (रायगड दक्षिण), संजय वाघुले (ठाणे शहर), मधुकर मोहपे (ठाणे ग्रा)

धीरज घाटे (पुणे शहर), वासुदेव काळे (पुणे ग्रा), शरद बुट्टे पाटील (मावळ), शंकर जगताप (पिंपरी चिंचवड), प्रकाश ढंग (सांगली शहर), निशिकांत भोसले पाटील (सांगली ग्रा), सचिन कल्याणशेट्टी (सोलापूर ग्रा), नरेंद्र काळे (सोलापूर शहर), चेतन केदार-सावंत (माढा)

Tags

follow us