Download App

‘संजय राऊतांवर बोलणं म्हणजे मोठा शाप’; सदाभाऊंचा राऊतांना खोचक टोला

Sadabahu Khot criticized Sanjay Raut : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (sanjay Raut) यांनी काल समृद्धी महामार्ग हा शापित असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या टीकेवर सत्ताधारी गटातील नेत्यांकडून चौफेर टीका करण्यात आली. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राऊतांच्या या वक्तव्यावर खोचक टोलेबाजी केली आहे.

खोत म्हणाले, संजय राऊतचं मला काहीच कळेना. ते महाभारतातलं संजय युद्ध खरं काय चाललंय ते सांगायचं धृतराष्ट्राला. इथं मात्र संजय राऊत उद्धव ठाकरेंना इतकं खोटं सांगत बसले. सगळं ओके सांगितले. पण ते (शिंदे गट आमदार) रात्रीचेच निघून गेले तरी यांना काहीच कळलं नाही. एकही गडी राहिला नाही. आता त्यांना नावं ठेवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे संजय राऊत आता काही बोलणे म्हणजे तो एक शापच ठरलं.

Buldhana Bus Accident : ‘ज्या मार्गाला शापित म्हणताय तो तर’.. राणांचा राऊतांवर पलटवार

रस्ते कुठे शापित असतात का. बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्या रस्त्याला दिलं आहे. दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे. रस्ता कसा शापित असेल बरं. पण, आता संजय राऊतवर बोलायचं झालं म्हणजे आधीच्या काळात गावगाड्यात लोक काय करायचे तर घुबड बघितलं की दिवसभर चिंतेत राहायचे. जेवण सुद्धा करत नसत. काय बोलावं आता त्या माणसावर असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी राऊतांना लगावला.

काय म्हणाले होते राऊत ?

गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आज पंचवीस लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले त्या अनेक गोष्टी आहेत. भविष्यात त्या समोर येतील. दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होतात, लोकांचा मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही. किती वेळा श्रद्धांजली व्हायच्या. वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली, त्यासंदर्भात काही होत नाही. भ्रष्टाचारासंदर्भात झालेला तो रस्ता आहे असं मला वाटतं असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला होता.

Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वेला लालफितीचा ब्रेक? दानवे म्हणतात, याला जबाबदार..

Tags

follow us