Buldhana Bus Accident : ‘ज्या मार्गाला शापित म्हणताय तो तर’.. राणांचा राऊतांवर पलटवार

Buldhana Bus Accident : ‘ज्या मार्गाला शापित म्हणताय तो तर’.. राणांचा राऊतांवर पलटवार

Ravi Rana replies Sanjay Raut : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग असल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच टीकेवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

फ्रान्समध्ये आणीबाणीची परिस्थिती! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक

या अपघातानंतर प्रतिक्रिया देताना आमदार राणा यांनी राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून विदर्भाला जोडणारा महामार्ग आहे. तांत्रिक टीमने यावर अभ्यास केला पाहिजे. संजय राऊत ज्या मार्गाला शापित म्हणतात त्या मार्गाचं नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्याला शापित म्हणणं अत्यंत चुकीचं आहे आणि संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शाप आहेत, अशी घणाघाती टीका राणा यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत ?

गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आज पंचवीस लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले त्या अनेक गोष्टी आहेत. भविष्यात त्या समोर येतील. दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होतात, लोकांचा मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही. किती वेळा श्रद्धांजली व्हायच्या. वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली, त्यासंदर्भात काही होत नाही. भ्रष्टाचारासंदर्भात झालेला तो रस्ता आहे असं मला वाटतं असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला.

Buldhana Bus Accident : अनेकांचे अश्रू अन् शापामुळे समृद्धीवर अपघात; संजय राऊतांचे धक्कादायक विधान

अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात आणि म्हणून हे अपघात तर होत नाहीत ना, अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube