Buldhana Bus Accident : अनेकांचे अश्रू अन् शापामुळे समृद्धीवर अपघात; संजय राऊतांचे धक्कादायक विधान

Buldhana Bus Accident : अनेकांचे अश्रू अन् शापामुळे समृद्धीवर अपघात; संजय राऊतांचे धक्कादायक विधान

Sanjay Raut on Bus Accident :नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस डिव्हायडरला धडकून, टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनचे तीव्र पडसाद उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे हे अपघात होत असल्याचं मला वाटतं, असं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

बुलढाण्यातील अपघातावर PM मोदीही हळहळले; तर फडणवीस म्हणतात, हा अपघात…

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आज पंचवीस लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले त्या अनेक गोष्टी आहेत. भविष्यात त्या समोर येतील. दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होतात, लोकांचा मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही. किती वेळा श्रद्धांजली व्हायच्या. वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली, त्यासंदर्भात काही होत नाही. भ्रष्टाचारासंदर्भात झालेला तो रस्ता आहे असं मला वाटतं असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला.

अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात आणि म्हणून हे अपघात तर होत नाहीत ना, अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली.

Buldhana Bud Accident : जीव वाचवण्यासाठी प्रवासी काचांवर हात मारत होते पण….

समृद्धी महामार्गाच्या बांधकामात दोष नाही – फडणवीस

या अपघातानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाची सदोष निर्मिती आणि मानवी त्रुटींमुळेच हे अपघात घडत असल्याचे म्हटले आहे. त्यावर देखील फडणवीसांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “समृद्धी हायवेचे बांधकाम हे अत्यंत सुरक्षित आहे. समृद्धी हायवेच्या बांधकामामध्ये कोणताही दोष नाही. आत्तापर्यंत जे अपघात झाले आहे, त्यामध्ये मानवी त्रुटी अथवा गाड्यांच्या अडचणी समोर आल्या आहे. त्यामुळे हायवेच्या बांधकामावर टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. आम्ही त्याठिकाणी स्मार्ट सिस्टीम लावणार आहोत. तिथे कॅमेरे लावून त्याच्या सहाय्याने मॉनिटरींग करणार आहोत.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube