Download App

तिथं उमेदवारापासूनच मारामारी, आम्हाला नो टेन्शन; मुख्यमंत्री बॅनरवर शिंदेचे पटोलेंना चिमटे

Eknath Shinde on Nana Patole’s Banner : महाविकास आघाडीतील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकू लागले आहेत. आधी जयंत पाटील नंतर अजित पवार आणि आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांचेही बॅनर झळकले आहेत. कल्याण येथे पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता. या फलकाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यावर पटोले यांना चांगलेच चिमटे काढले आहेत.

शिंदे यांनी आज रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पटोलेंच्या या फलकाबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिंदे म्हणाले, चांगलं आहे प्रत्यक्ष नाही तर बोर्डावर तर फोटो लागतो. त्यांच्यात चढाओढ लागली आहे. त्यांना आनंद घेऊ द्या. त्यांनी आधी पीएम का सीएम यासाठी एक उमेदवार तर निश्चित केला पाहिजे. उमेदवारापासूनच मारामारी आहे. त्यामुळे त्याची आम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही.

नेतेमंडळींना झटका! वाढदिवस, राजकीय कार्यक्रमात बैलगाडा शर्यतींना ब्रेक

या देशातली या महाराष्ट्रातली जनता सूज्ञ आहे. गेले अडीच वर्ष हे महाविकास आघाडी सरकार घरी झोपलं होत. घरी बसलं होतं. आज आम्ही लोकांच्या दारी योजना घेऊन जातोय तर लोक कुणाच्या बाजूने उभे राहतील. घरात बसून फेसबुक लाइव्ह ऑनलाइन काम करणाऱ्या माणसाला मदत करतील की प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन लोकांच्या सुख दुःखात सामील होणाऱ्या सरकारला मदत करतील हा सरळ माझा सवाल आहे, असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. अशात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत येणार आहेत. त्यावेळी कल्याणमध्ये पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. कल्याणमधील बॅनरवरुन आता एकच चर्चा सुरु आहे.

CM शिंदेंनी बोलून दाखविली खदखद; प्रकाश आंबेडकरांनी लगोलग दिली ऑफर!

 

Tags

follow us