Vijay Wadettiwar : आता बजरंगबलीच रवी राणाची पाठ फोडतील; वडेट्टीवारांचा घणाघात

Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून सरकारवर तुफान हल्लाबोल सुरू केला आहे.आता त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजपने बजरंगबलीच्या नावावर मते मागितली पण, बजरंगबलीसुद्धा त्यांना वाचवू शकले नाहीत. तेथे इतका मोठा […]

Ravi Rana And Vijay Wadettiwar

Ravi Rana And Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून सरकारवर तुफान हल्लाबोल सुरू केला आहे.आता त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजपने बजरंगबलीच्या नावावर मते मागितली पण, बजरंगबलीसुद्धा त्यांना वाचवू शकले नाहीत. तेथे इतका मोठा पक्ष वाचला नाही तर तो रवी राणा काय वाचणार?, आता बजरंगबलीच गदा मारून राणाची पाठ फोडतील आणि म्हणतील की, माझं नाव घेऊ नको, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

Devendra Fadanvis : पुणे विचारवंतांचे शहर, इथे निर्णय घेणे अवघड; पुणेकरांना फडणवीसांचे मिश्किल टोले

ते पुढे म्हणाले, सरकार जर चुकीची कामे करत असेल आणि ही गोष्ट लक्षात आली तर त्याविरुद्ध बोलत राहणे हे माझे काम आहे ते मी करतच राहणार. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणे मात्र टाळले.

नवाब मलिक आता अजित पवारांच्या गटात जातील असा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला होता. त्याबद्दल विचारले असता मी आज काही बोलणार नाही. मलिकांच्या बाबतीत पुढे काय होते, ते पहावे लागेल. ते कुठे जातात ते अजित पवारांकडे जातात का हे आत्ताच सांगता येणे शक्य नाही. आजवर ईडी, सीबीआयच्या विरोधात बोलणारे आता सत्तेसाठी मूग गिळून बसतात का हे सुद्धा समजेल. त्यामुळे आताच अंदाज बांधणे कठीण होईल असे वडेट्टीवार म्हणाले.

केंद्राचं लक्ष पुण्यावर पण, महिलांचा प्रश्न गंभीरच; चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यात गोऱ्हेंची नाराजी

 

Exit mobile version