Download App

पटोले-राऊत भिडले ! चोमडेगिरीच्या वादावर राऊतांचा पलटवार; ‘असा’ सुरू झाला वाद

Sanjay Raut vs Nana Patole : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. या वादाला सुरुवात राऊत यांच्या वक्तव्याने झाली. त्याला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाच चोमडेगिरी करू नये, अशा शब्दांत पटोले यांनी सुनावले. त्यावर राऊत यांनीही पटोले यांच्यावर पलटवार केला.

वाद कसा सुरू झाला ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी राऊत म्हणाले, की राहुल गांधी आता पक्षाचे अध्यक्ष नाहीत. मल्लिकार्जुन खर्गे आहेत, काय फरक पडतोय. निर्णय तर राहुल गांधीच घेणार ना. शरद पवारही तसेच मोठे नेते आहेत,असे राऊत म्हणाले होते.

भाजप काहीही करु शकतो पण… राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

त्यांच्या या वक्तव्यावर पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पटोले म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्षे आमदार, खासदार राहिले आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. संघटनेतही ब्लॉक अध्यक्ष पदापासून ते काम करत आले आहेत. खर्गे यांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणं आणि गांधी परिवारावर चुकीचे आरोप करणे ही चोमडेगिरी संजय राऊतांनी थांबवावी. हे चुकीचे होणार. अशा पद्धतीने दुसऱ्याचे प्रवक्ते होता. आमच्या पक्षात चोमडेगिरी करू नका, असा आमचा त्यांना सल्ला आहे.

चोमडेगिरी कोण करतयं हे काळच सांगेल – राऊत

राऊत म्हणाले, त्यांच्या पक्षाविषयी कुणीच काही बोलत नाही. त्यांच्या पक्षाविषयी शरद पवारांनी पुस्तकात भूमिका मांडली आहे. त्यांनी त्यांच्यावर बोलले पाहिजे. आणि चाटूगिरी, चोमडेगिरी कोण करतंय हे येणारे काळच ठरवेल. महाविकास आघाडीच्या ऐक्यावर परिणाम होणार असेल तर आम्हालाही बोलण्याचा अधिकार आहे.

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

Tags

follow us