भाजप काहीही करु शकतो पण… राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

भाजप काहीही करु शकतो पण… राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

खासदार हा फक्त टॅग आहे. ही एक पोस्ट आहे म्हणून भाजप टॅग काढू शकते, ते पद घेऊ शकतात, ते घर घेऊ शकतात आणि ते मला तुरुंगातही टाकू शकतात, परंतु ते मला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाही, असा टोला काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजप सरकारला लगावला आहे.

मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

भाजपला वाटतंय की, ते माझ्या घरी पोलिस पाठवून मला घाबरवतील, पण त्यांनी माझे घर घेतले याचा मला आनंद झाला. तुम्ही माझे घर 50 वेळा घेतात पण मला पर्वा नाही. त्यानंतरही मी देशाचे आणि वायनाडच्या जनतेचे प्रश्न मांडतच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुमचे अदानीशी नाते सांगण्यास सांगितले होते, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला उत्तर दिले नसल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच भाजपचे मंत्री संसदेत माझ्याबद्दल खोटे बोलले. मी स्पीकरकडेही गेलो, पण तरीही मला बोलू दिले नाही.

Sharad Pawar Retirement : ‘आम्ही लक्ष ठेवून’; पवारांच्या निवृत्तीवर फडणवीसांचे सूचक विधान

भाजपने मला संसदेतून अपात्र केले आहे, माझे घर घेतले आहे आणि 24 तास माझ्यावर हल्ले करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्यावर कितीही हल्ले झाले तरी, मी थांबणार नाही. या अपात्रतेमुळे वायनाडच्या लोकांशी माझे नाते अधिक घट्ट होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 2019 च्या मोदी आडनाव प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी मंगळवारी पहिल्यांदाच केरळमधील वायनाड दौरा केला. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप हल्लाबोल चढवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube