Download App

राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला; प्रफुल्ल पटेलांनी खरं काय सांगूनच टाकलं

राष्ट्रवादीतील राजकीय नाट्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्र्यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्ही काही भूकंप होईल का अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली.

अजितदादा-शरद पवार भेटीमागे सर्व्हेचा धसका? 24 तासांतच फुटीर गटाची आशीर्वादासाठी धावाधाव

आमचे सर्वांचे दैवत, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवा, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालो. शरद पवार येथे एका बैठकीसाठी आल्याचे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांच्या भेटीची वेळ न मागता त्यांच्या भेटीसाठी आलो. ही संधी साधून आम्ही त्यांची भेट घेतली, असे पटेल म्हणाले.

शरद पवारांची काय रिअॅक्शन होती ?

ते पुढे म्हणाले, पवार साहेबांच्या पाया पडून आम्ही त्यांचे आशिर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी त्यांना विनंतीही केली की आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच पण, पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा आणि आागामी काळात आम्हाला मार्गदर्शन करावं. पवार साहेबांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पण, यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील, असे पटेल यांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us