अजितदादा-शरद पवार भेटीमागे सर्व्हेचा धसका? 24 तासांतच फुटीर गटाची आशीर्वादासाठी धावाधाव
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठे धक्कातंत्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फुटीर गटाचे सर्व मंत्री आणि नेत्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल अशा सर्वांनी पवारांची भेट घेतली. (After Saam and Sakal Survey along with Ajit Pawar and minister meet NCP President Sharad Pawar)
देवगिरी बंगल्यावरील बैठक पार पडल्यानंतर अजितदादांसह सर्व मंत्री आणि नेते यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते. जयंंत पाटील हे उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होते. मात्र सुप्रिया सुळे यांचा फोन येताच ते बैठक अर्ध्यावर सोडून तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. त्यामुळे मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत होते.
राज्याच्या राजकारणात पुन्हा धक्कातंत्र : अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला
मात्र या भेटीनंतर बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही केवळ शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. शरद पवार साहेब आमचे दैवत आहेत. पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पक्ष एकत्रित कसा राहील यासाठी पवारांनी विचार करावा, अशी विनंती आम्ही त्यांना केली. पवार साहेबांनी आमच्या सर्वांच म्हणणं ऐकलं पण प्रतिक्रिया दिली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित राहावा ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असेही पटेल म्हणाले.
आशुतोष काळे अजितदादांच्या गटात कसे गेले… वाचा पडद्यामागची कहाणी खुद्द त्यांच्याच जुबानी
दरम्यान, या भेटीमागे नुकताच आलेला राजकीय सर्व्हेचा धसका आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. नुकताच साम वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार 64% मतदारांची सहानुभूती शरद पवार यांना असल्याचे दिसून आले होते. तर 23.3 टक्के लोकांनी शरद पवारांना सहानुभूती मिळनार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 18 टक्के लोकांनी नाही असे मत नोंदविले होते. तर 18 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे म्हटले होते. अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या मतदारांना पटला नसल्याचे या सर्व्हेतून दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व फुटीर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली का असा सवाल विचारला जात आहे.