Download App

‘कायदा आम्हालाही कळतो, सगळा विचार करूनच निर्णय घेतला’; भुजबळांनी जयंत पाटलांना ठणकावले!

NCP Rebellion Seperate Meetings : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले.

एमईटी येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिलीप वळसे पाटील, आ. धनंजय मुंडे, आ. संग्राम जगताप, निलेश लंके, नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, रामराजे निंबाळकर, धर्मरावबाबा आत्राम, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

कॉंग्रेस म्हणू… कॉंग्रेसच आणू… राष्ट्रवादीतील बंडादरम्यान कॉंग्रेसच्या पोस्टरची चर्चा

भुजबळ पुढे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी, सर्व आमदारांनाी अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला हे खरे आहे. परंतु, जसजशी भाषणे होतील त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. 40 पेक्षा जास्त आमदार आमच्या पाठिशी आहेत. या सर्व आमदारांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. आमच्यावर कारवाई सुरू होईल असं आता सांगितलं जात आहे. मी सुद्धा शरद पवारांबरोबर काम करतोय. नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही कसं काम करू. कायदा आम्हालाही कळतो. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे भुजबळ म्हणाले.

आमचा कान पकडा तुमचा अधिकार पण..

आम्ही बाहेर पडलो त्याचे कारण म्हणजे पवार साहेबांभोवती अनेक बडवे जमा झाले आहेत. त्यांनीच आता सगळं वाटोळं करण्याचं काम चालवलं आहे. त्यांना आधी बाजूला करा. आमचे कान पकडा तो तुमचा अधिकार पण, आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुमच्या बाजूचा धूर काढून टाका, असे भुजबळ म्हणाले.

 

 

Tags

follow us