‘उद्धवजी, वाचाळपणा बंद करा अन्यथा लोकांचा संयम’..; विखे पाटलांचा ठाकरेंना रोखठोक इशारा

Radhakrishna Vikhe challenges Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाची तुलना औरंगजेबाबरोबर केल्याने भाजप नेते चवताळून उठले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. आशिष शेलार, चित्रा वाघ, नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना थेट  इशाराच देऊन टाकला. ‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या […]

Radhakrishna Vikhe And Uddhav Thackeray

Radhakrishna Vikhe And Uddhav Thackeray

Radhakrishna Vikhe challenges Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाची तुलना औरंगजेबाबरोबर केल्याने भाजप नेते चवताळून उठले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. आशिष शेलार, चित्रा वाघ, नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना थेट  इशाराच देऊन टाकला.

‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण?’ नितेश राणेंचा ठाकरेंना जळजळीत सवाल

मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाजपवरील टीकेला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी काही मान मर्यादा सांभाळण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दलही लोकं वाईट बोलू शकतात. मी सुद्धा बोलू शकेन. तुम्हाला दिलेल्या पदाचा उपयोग अशा पद्धतीने भाषा करण्यासाठी नाही. औरंगजेबाच्या कबरीवर ज्यावेळी फुलं वाहिली जात होती त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? त्याचं उदात्तीकरण कोणाच्या काळात झालं? याचं आत्मपरिक्षण उद्धव ठाकरे यांनी करण्याची गरज आहे. मला वाटतं त्यांनी त्यांचा वाचाळपणा बंद केला पाहिजे नाहीतर लोकांचा संयम सुटेल, मग लोकं मान मर्यादा ठेवणार नाहीत, याचं भान उद्धव ठाकरेंनी ठेवावं, अशा शब्दांत विखे यांनी इशाराच दिला.

राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण- राणे

‘मनसेचे सहा नगरसेवक पळविणारा औरंग्या कोण होता?, राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता?, बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्य कोण होता?, आता कोठडी दिसायला लागली तर नाती आठवली! अशा कपटी वृत्तीचा खरा औरंग्या कोण?’ असे जळजळीत सवाल करत राणेंनी उद्धव ठाकरे यांना सुनावले.

काय म्हणाले होते ठाकरे?

आधी शिवसेना पक्ष चोरला आता राष्ट्रवादी चोरला आहे, एवढंच नाहीतर आता काँग्रेसच्या फोडायच्या तयारीत आहेत. आधी एक उपमुख्यमंत्री होता आता दुसरा उपमुख्यमंत्री आहे, असंच पक्षात कोण आले आणि कोण गेले हे लिहिण्यासाठी देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाले आहेत.

Exit mobile version