‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण?’ नितेश राणेंचा ठाकरेंना जळजळीत सवाल
Nitesh Rane criticized Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मी असताना दंगल झाली का, आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजे जिंवत आहे का, फडणवीस साहेब तुमच्या पक्षात दडला आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. ही टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे.
राणे म्हणाले, ‘मनसेचे सहा नगरसेवक पळविणारा औरंग्या कोण होता?, राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता?, बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्य कोण होता?, आता कोठडी दिसायला लागली तर नाती आठवली! अशा कपटी वृत्तीचा खरा औरंग्या कोण?’ असे जळजळीत सवाल करत राणेंनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.
ज्यांचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज.., ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी…
उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर
याआधी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. “स्वतःच्या पक्षासाठी डिझास्टर ठरलेल्या उद्धव ठाकरेंना @uddhavthackeray मस्टर आणि मास्टर ब्लास्टरमधला फरक तो काय कळणार? तुम्ही मुख्यमंत्रीपदी असताना पक्षातील आमदार खासदारांना सांभाळता आले नाही, यापेक्षा मोठं डिझास्टर काय असू शकतं आणि विरोधी पक्षात असताना एकही आमदार देवेंद्र फडणवीस यांना सोडून गेला नाही, यापेक्षा उत्तम नेतृत्व ते काय असू शकतं?
देवेंद्रजींनी विरोधी पक्षनेते असताना तुमच्या तिघांच्याही दांड्या उडवल्या आणि सत्तेत असताना निर्णयाचे चौकार-षटकार लगावले. देवेंद्रजी मस्टर नव्हे, तर मास्टर ब्लास्टर मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही मात्र राज्य आणि स्वत:चा पक्ष या दोघांसाठीही नष्टर आहात, हेही विसरू नका. अभ्यास कच्चा असल्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यानं मेरिटमध्ये आलेल्यांवर बोलायचं नसतं”
उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर.., चित्रा वाघ यांच्या ट्विटने लक्ष वेधलं
काय म्हणाले होते ठाकरे?
आधी शिवसेना पक्ष चोरला आता राष्ट्रवादी चोरला आहे, एवढंच नाहीतर आता काँग्रेसच्या फोडायच्या तयारीत आहेत. आधी एक उपमुख्यमंत्री होता आता दुसरा उपमुख्यमंत्री आहे, असंच पक्षात कोण आले आणि कोण गेले हे लिहिण्यासाठी देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाले आहेत.