Download App

‘तुम्ही यज्ञ करा, पूजा करत बसा तेच तुमचे काम’.. भुमरेंचा खैरेंना खोचक टोला

Sandipan Bhumre on Chandrakant Khaire : आमचे मित्र चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यज्ञाला बसल्याचे मी ऐकत आहे. त्यांची पूजा चालू आहे. ते आता पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आता त्यांनी असेच यज्ञ करत राहावे. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार असेच भक्कमपणे चालणार आहे. आगामी निवडणुकीतही युतीचेच सरकार राज्यात येणार आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी यज्ञ आणि पूजा करत बसावे कारण, एवढेच काम त्यांच्याकडे राहिले आहे, अशी खोचक टीका रोहयो मंत्री सांदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केली. मंत्री भुमरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आता शिंदे सरकारला कोणताही धोका राहिलेला नाही. आता खरा धोका त्यांना आहे. न्यायालयाने दिलेला निकाल नाकारण्याचा काहीच प्रश्न नाही. महत्वाचे म्हणजे, न्यायालयाच्या या निर्णयाने शिंदे सरकारला आता कोणताही धोका राहिलेला नाही, असे भुमरे यांनी स्पष्ट केले.

निर्णयात चुकलेले कोश्यारी थेट काशीत; निकालावेळी न्यायालयाने वाचला चुकांचा पाढा

सरकार जरी वाचले असले तरी या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीच अधिकार नाही. त्यामुळे राजीनामा देण्याची मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे. यावर भुमरे म्हणाले, न्यायालयाने शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. नैतिकतेचा प्रश्न येतोच कुठे, न्यायालयाने अगदी स्पष्ट सांगितले आहे की सरकारला कोणताही धोका नाही. मग हा अनिल परब कोण, कोर्टापेक्षा मोठा आहे का हा असे सवाल उपस्थित करत आता त्यांच्याकडील राहिलेले जे आमदार आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे भुमरे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananajay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला. या निकालात न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. राज्यपालांचे निर्णय चुकल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

तुमच्या बाजूनं निर्णय दिल्यास संस्था चांगल्या अन्… मुख्यमंत्री शिंदेंनी फटकारलं

Tags

follow us